अमेरिकेत काय चाललंय; निवडणुकीसाठी डोनाल्ड ट्रम्प आणि फेसबुकची 'डील'?

कार्तिक पुजारी
Tuesday, 21 July 2020

अमेरिकेतील राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका आणि फेसबुक हा नेहमीच वादाचा विषय राहिला आहे. २०१६ मध्ये रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांना राष्ट्रपतीपदी निवडून आणण्यामध्ये फेसबुकचा मोठा वाटा असल्याचा दावा केला जातो.

वॉशिंग्टन- अमेरिकेतील राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका आणि फेसबुक हा नेहमीच वादाचा विषय राहिला आहे. २०१६ मध्ये रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांना राष्ट्रपतीपदी निवडून आणण्यामध्ये फेसबुकचा मोठा वाटा असल्याचा दावा केला जातो. कँम्ब्रिज अॅनालिटा प्रकरणात लाखो अमेरिकी नागरिकांच्या फेसबुक खात्याची माहिती चोरीला गेल्याचं स्पष्ट झालं होतं. ही खाते राजकीय जाहीरातीसाठी वापरण्यात आली होती. फेसबुकच्या इतिहासातील ही सर्वात मोठी चोरी होती. आता २०२० च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फेसबुक पुन्हा चर्चेत आली आहे.

आरबीआयने सायबर घोटाळ्यांबाबत केले सावध! या चुका टाळा अन्यथा गमवाल पैसे
राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची वादग्रस्त पोस्ट न हटवण्याचा निर्णय घेतल्याने फेसबुकवर टीका होत आहे. याच कारणामुळे शेकडो कंपन्यांनी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर जाहीरात न करण्याचा निर्णय घेतला आहे. फेसबुक डोनाल्ड ट्रम्प यांना विशेष वागणूक देत असल्याचा अनेकांचा आरोप आहे. शिवाय ट्रम्प आणि मार्क झुकरबर्ग यांच्यात काही 'डील' झाली आहे काय? असे प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले आहेत. शिवाय फेसबुकमधील अधिकाऱ्यांची रिपब्लिकन नेत्यांसोबत असलेली सलगी लपून राहिलेली नाही.  फेसबुकच्या व्यासपीठावर होणाऱ्या द्वेषयुक्त भाषणांना रोखण्यात कंपनी असमर्थन ठरल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. शिवाय ट्विटरने ज्याप्रमाणे राजकीय जाहीरातींवर पूर्णपणे बंदी घातली आहे, त्याप्रमाणे फेसबुकने पाऊल उचलावे अशी मागणी होत आहे.

फेसबुक अमेरिकेतील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय जाहीरातींवर बंदी आणण्याचा विचार करत असल्याच्या चर्चा काही दिवसांपासून होत आहेत. मात्र, याबाबतची अंतिम योजना अद्याप फेसबुककडून जाहीर झालेली नाही. फेसबुकवरील राजकीय जाहीरातींनी २०१६ च्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत नागरिकांववर मोठा प्रभाव पाडला होता. रशियानेही फेसबुकच्या व्यासपीठाद्वारे राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत हस्तक्षेप केल्याचं उघड झालं होतं. त्यामुळे फेसबुककडून यावेळी काही कठोर पावलं उचलले जाण्याची अपेक्षा आहे.

चीनने जाणूनबुजून कोरोना विषाणू जगभर पसरु दिला; ट्रम्प यांचा गंभीर आरोप
मार्क झुकरबर्ग यांची भूमिका

फेसबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्ग यांनी होणाऱ्या आरोपांवर प्रतिक्रिया दिली आहे. डोनाल्ड ट्रम्प आणि माझ्यात कोणतीही डील झाली नाही. शिवाय हा आरोप हास्यास्पद असल्याचं ते म्हणाले आहेत. मी ज्याप्रमाणे मागील अमेरिकेच्या अध्यक्षांशी आणि जागतिक नेत्यांसोबत बोलतो, त्याचप्रमाणे माझे ट्रम्प यांच्याशी बोलणे होत असल्याचं ते म्हणाले. शिवाय ट्रम्प यांचे स्थलांतरितांबाबतचे धोरण, पॅरिस करारातून माघार आणि त्यांची जहाल वक्तव्यं याबाबत माझे त्यांच्याशी मतभेद असल्याचं मार्क म्हणाले आहेत.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Donald Trump and Facebook deal for us election