भारताला डिवचणाऱ्या चीनला डोनाल्ड ट्रम्प यांनी सुनावले खडेबोल

वृत्तसंस्था
गुरुवार, 2 जुलै 2020

भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने पुन्हा एकदा चीनला खडेबोल सुनावले आहेत. व्हाईट हाऊसच्या प्रेस सचिव केली मैक्नेनी यांनी अमेरिकी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या वतीने बोलताना म्हटलं की, 'चीन नेहमीच भारताविरोधात आक्रमक राहिला आहे. भारतासह इतर देशांविरोधात आक्रमकता दाखवून चीनच्या कम्युनिस्ट पार्टीने आपला खरा चेहरा दाखवला आहे.

वॉशिंग्टन- भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने पुन्हा एकदा चीनला खडेबोल सुनावले आहेत. व्हाईट हाऊसच्या प्रेस सचिव केली मैक्नेनी यांनी अमेरिकी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या वतीने बोलताना म्हटलं की, 'चीन नेहमीच भारताविरोधात आक्रमक राहिला आहे. भारतासह इतर देशांविरोधात आक्रमकता दाखवून चीनच्या कम्युनिस्ट पार्टीने आपला खरा चेहरा दाखवला आहे. दोन्ही देशातील वादावर अमेरिका लक्ष ठेवून असून दोन्ही देशातील तणाव कमी व्हावी अशी आमची इच्छा आहे'.

चीनला मोठा झटका; संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत 'या' दोन देशांनी...
अमेरिकेने यापूर्वीही चीनविरोधात भूमिका घेतली होती. मात्र, यावेळी अमेरिकेकडून स्पष्ट आणि तिखट शब्दांत सुनावण्यात आलं आहे. डोनाल्ड ट्रम्प परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. चीनने भारताविरोधात जो वाद सुरु केला आहे, तोच चीनचा खरा चेहरा आहे. चीनने इतर राष्ट्रांसोबतही आक्रमकता दाखवली आहे. कम्युनिस्ट पार्टी सरकारची हीच खरी ओळख आहे, असं मैक्नेनी म्हणाल्या आहेत. मैक्नेनी यांना पत्रकार परिषदेत भारत-चीन सीमा वादावर प्रश्न विचारण्यात आला होता. 

काही दिवसांपूर्वी अमेरिकेने चीनच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील (LAC)  हालचालींवर चिंता व्यक्त केली होती. तसेच चीनने आपली विस्तारवादी भूमिका सोडून द्यावी आणि जैसे-थै स्थितीत यावं असं अमेरिकेनं सुनावलं होतं. चीनच्या या आक्रमक भूमिकेचा आंतरराष्ट्रीय संबंधावर मोठा प्रभाव पडू शकतो. उभय देशांमधील तणाव कमी व्हावा अशी आमची इच्छा आहे, असंही अमेरिकेनं म्हटलं होतं. 

मनात कोरोनाची भिती असेल तर सरकारने तुमच्यासाठी घेतलाय मोठा निर्णय 
भारताने 59 चीनी अॅपवर बंदी घालण्याच्या निर्णायाचे अमेरिकेने स्वागत केले आहे. भारताने घेतलेल्या या निर्णयामुळे त्यांच्या सार्वभौमत्वाचे रक्षण होणार आहे, असं अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पोम्पिओ म्हणाले आहेत. तसेच चीनने आपली आक्रमक भूमिका सोडून द्यावी, असे खडेबोल सुनावले आहेत. चीनच्या आक्रमकपणाला अनेक देशांकडून होताना दिसत आहे.

दरम्यान, पूर्व लडाखमधील गलवान भागात झालेल्या रक्तरंजित संघर्षामुळे भारत-चीनमधील संबंध स्फोटक बनले आहेत. संघर्षामुळे भारताचे 20 जवान हुतात्मा झाले होते. त्यामुळे भारताने चीनविरोधात कडक पाऊलं उचलणे सुरु केलं आहे. 59 चिनी अॅपवर भारतात बंदी आणण्यात आली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: donald trump criticize chin over india issue