‘रेमेडिसिव्हीर’ प्रभावी ठरत असल्याचा पुरावा नाही; शिफारस न करण्याचा WHO चा निर्णय

सकाळ वृत्तसेवा
Friday, 20 November 2020

रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णाला कोरोना विषाणूचा कितीही कमी अथवा अधिक संसर्ग झाला असला तरी रेमेडिसिव्हीरचा वापर करण्याचा सल्ला देता येणार नाही, असे ‘डब्लूएचओ’च्या समितीने म्हटले आहे.

जिनिव्हा - अमेरिकेतील गिलीड कंपनीच्या रेमेडिसिव्हीर या औषधामुळे कोरोना रुग्ण बचावण्याची शक्यता वाढत असल्याचा किंवा त्याचे ऑक्सिजनवरील अवलंबित्व कमी होत असल्याचा कोणताही पुरावा नसल्याने या औषधाची कोरोनावरील उपचारांसाठी शिफारस करता येणार नाही, असे जागतिक आरोग्य संघटनेने आज जाहीर केले. रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णाला कोरोना विषाणूचा कितीही कमी अथवा अधिक संसर्ग झाला असला तरी रेमेडिसिव्हीरचा वापर करण्याचा सल्ला देता येणार नाही, असे ‘डब्लूएचओ’च्या समितीने म्हटले आहे.

कोरोना रुग्णांवरील उपचारांत प्रभावी ठरणारे औषध म्हणून प्रसिद्धी झाल्याने गिलीड कंपनीच्या रेमेडिसिव्हीर औषधाचे नाव सामान्यांनाही ठाऊक झाले. या औषधामुळे मृत्यू दर कमी होण्यास आणि श्‍वसनप्रक्रिया सुधारण्यास मदत होते, असा दावा केला जात होता. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर उपचार करतानाही रेमेडिसिव्हीरचा वापर झाला होता. मात्र, या दाव्यांना कोणताही आधार नसल्याचे आणि तसा पुरावाही नसल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केल्यामुळे गिलीड कंपनीला धक्का बसला आहे. कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी अनेक देशांमध्ये रेमेडिसिव्हीरचा अधिकृत वापर होतो. मात्र, ‘डब्लूएचओ’ने गेल्या महिन्यात घेतलेल्या सॉलिडॅरिटी चाचण्यांमध्ये या औषधाचा काहीही परिणाम होत नसल्याचे आढळून आले आहे.

हे वाचा - Covid-19: 'क्लिनिकल ट्रायल' म्हणजे काय ? कशी होते लशीची चाचणी

अपेक्षेपेक्षा रेमेडिसिव्हीरला जगभरातून कमी मागणी आल्याने गेल्या महिन्यातही कंपनीला त्यांच्या संभाव्य खर्चात कपात करावी लागली होती. अर्थात, ‘डब्लूएचओ’ने शिफारस केली असली तरी तिची अंमलबजावणी करण्याचे कोणत्याही देशावर बंधन नाही. मात्र, कोरोनावर उपचार करण्यासाठी सध्या या संघटनेच्या मार्गदर्शक सूचनांचाच आधार घेतला जातो.

आरोग्य संघटनेच्या या शिफारशीनंतर रेमेडिसिव्हीरच्या वापराबाबत फेरविचार व्हायला हवा. हे अत्यंत महागडे औषध असून ते रुग्णांना पाच ते दहा दिवस द्यावे लागते. ताज्या शिफारशीमुळे रुग्णांच्या पैशांची बचत होईल.
- पीटर हॉर्बी, संशोधक, ऑक्सफोर्ड विद्यापीठ

हे वाचा - कोरोनासंबंधी मोठी अपडेट; सरकारची मंजुरी मिळाली की लस बाजारात

गिलीड कंपनीचा चाचण्यांवर संशय
गिलीड कंपनीने जागतिक आरोग्य संघटनेच्या सॉलिडॅरिटी चाचण्यांवर संशय व्यक्त केला आहे. ‘अनेक देशांमधील मान्यताप्राप्त संस्थांनी घालून दिलेल्या नियमांच्या आधारावरच रेमेडिसिव्हीरची निवड झाली आहे. जगभरात कोरोना रुग्णांची संख्या अत्यंत वेगाने वाढत असताना या औषधाच्या आधी झालेल्या उपयोगाकडे आणि परिणामांकडे आरोग्य संघटनेने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: who advise dont use gild remdesivir for covid 19 treatment