

Discussion sparked over the look of Susan Dell seen at Donald Trump's event.
Sakal
वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत एका कार्यक्रमात दिसलेल्या महिलेचा फोटो सध्या जगभरातील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या फोटोवरून नेटकऱ्यांनी तिच्या लुक, मेकअप आणि चेहऱ्याची खिल्ली उडवत तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली. मात्र, ज्या महिलेला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे, तिची खरी ओळख आणि संपत्तीचा आकडा समोर आल्यानंतर सर्वांचे डोळे पांढरे झाले आहेत. ही महिला जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेल्या डेल टेक्नॉलॉजीजच्या (Dell Technologies) संस्थापकाची पत्नी असून, त्यांच्या कुटुंबाची संपत्ती तब्बल २७ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.