डोनाल्ड ट्रम्प यांचा अखेर पारंपरिक सभांना फाटा

यूएनआय
Monday, 20 July 2020

दोन सभा रद्द
ट्रम्प यांची टुल्सामध्ये सभा झाली होती, पण त्यावेळी त्यांच्या प्रचार पथकातील सहा जणांना कोरोना लागण झाली होती. त्यामुळे त्यांना हे पाऊल उचलावे लागले. पोर्ट््समाऊथ व न्यू हॅम्पशायर अशा दोन सभा त्यांनी रद्द केल्या. नव्या तारखा अद्याप जाहीर करण्यात आलेेल्या नाहीत.

वॉशिंग्टन - कोरोना संसर्ग वाढत असताना पारंपरिक सभा घेणे धोकादायक ठरेल याची अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अखेर उपरती झाली आहे. आता दूरध्वनीवरून प्रचार करण्यावर भर देण्याचा संकल्प त्यांनी सोडला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

विस्कॉन्सीन येथील समर्थकांसाठी ट्रम्प यांनी याच माध्यमाचा वापर केला. शुक्रवारी त्यांनी या उपक्रमास प्रारंभ केला. सीएनएनने दिलेल्या वृत्तानुसार ट्रम्प यांनी दूरध्वनीवरील संदेशात सांगितले की, मला तुमच्या सहवासात यायचे होते. आपल्या सर्वांना खूप आवडणाऱ्या सभांची जागा या माध्यमाने घेतली आहे.

ब्रिटनमध्ये लाखो प्रतिपींड चाचण्या मोफत;20 मिनिटांत निदान, 98.6 टक्के अचूकता

ट्रम्प पुढे म्हणाले की, कोरोनाच्या संदर्भात औषधोपचार आणि लसीबाबत आपण खरोखरच चांगली कामगिरी करीत आहोत, पण जोपर्यंत हा संकट जात नाही तोपर्यंत भव्य प्रचार सभा घेणे अवघड जाईल. त्यामुळे मी दूरध्वनी करतो आहे. आपण याला ट्रम्प सभाच म्हणून, फक्त ती  दूरध्वनीवरून घेऊ.

पुराने चीन हैराण; स्फोटकांनी धरण फोडण्याची आली वेळ!

दोन सभा रद्द
ट्रम्प यांची टुल्सामध्ये सभा झाली होती, पण त्यावेळी त्यांच्या प्रचार पथकातील सहा जणांना कोरोना लागण झाली होती. त्यामुळे त्यांना हे पाऊल उचलावे लागले. पोर्ट््समाऊथ व न्यू हॅम्पशायर अशा दोन सभा त्यांनी रद्द केल्या. नव्या तारखा अद्याप जाहीर करण्यात आलेेल्या नाहीत.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Donald Trump finally split the traditional meetings