पुराने चीन हैराण; स्फोटकांनी धरण फोडण्याची आली वेळ!

वृत्तसंस्था
सोमवार, 20 जुलै 2020

यांगत्से नदीची उपनदी असलेल्या चूहे नदीवर हे धरण बांधण्यात आले होते. आणि जगातील सर्वात मोठ्या धरणांपैकी ते एक होते.

बीजिंग : मुसळधार पावसाने चीनला चांगलेच झोडपून काढले आहे. त्यामुळे सध्या चीनमधील काही भागांमध्ये महापूरासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. पुरामुळे आतापर्यंत दीडशेहून अधिकजणांना आपला जीव गमवावा लागला आहे. चीनमधील च्यांगशी प्रांतातील पोयांगहू भागातील ५२.१ लाख लोकांना या पुराचा फटका बसला आहे. यापैकी फक्त ४ लाख लोकांना आतापर्यंत सुरक्षित स्थळी पोहोचवण्यात आलं आहे.

भारतातून हाकललेल्या त्या महिला खासदारावर पाक सरकारने केला लाखोचा खर्च​

दुसरीकडे अनहुई प्रांतातील परिस्थितीही काहीशी अशीच आहे. महापूराची स्थिती ओढवल्यामुळे चीन सरकारने मोठा निर्णय घेतला. आणि त्याची अंमलबजावणीही केली. याची जेव्हा सर्वत्र चर्चा झाली, त्यावेळी अनेकांच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव दिसून आले. अनहुई प्रांतातील पूराचं पाणी ओसरावं यासाठी चीनी सरकारने स्फोटकं लावून धरणंच फोडलं.   

पाण्याचा दाब कमी करण्यासाठी धरण फोडलं
चीनची सरकारी वृत्तवाहिनी असलेल्या सीसीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, पुरामुळे अनहुई प्रांताच्या सखल भागातही पाणी साचले होते. आणि या पाण्याचा दाबही प्रचंड होता. हा पाण्याचा दाब कमी करण्यासाठी स्फोटकं लावून धरण फोडण्याचे ठरले आणि ते रविवारी (ता.२०) फोडलेही. यांगत्से नदीची उपनदी असलेल्या चूहे नदीवर हे धरण बांधण्यात आले होते. आणि जगातील सर्वात मोठ्या धरणांपैकी ते एक होते. यावर्षी मुसळधार पाऊस झाल्याने दक्षिण चीनमधील यांगत्से सहित सर्वच नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. 

भारत नव्हे, जपान देणार चीनला मोठा दणका; निर्णय झाला​

धरणाचे सर्व दरवाजे उघडूनही झाला नाही फायदा
गेल्या आठवड्यातच धरणातील पाण्याची पातळी वाढल्याने यांगत्से नदीवर उभारण्यात आलेल्या थ्री जॉर्ज या धरणाचे तीन फ्लडगेट उघडण्यात आले होते. मुसळधार पावसामुळे धरणातील पाणी पातळी पूर नियंत्रण रेषेच्यावर १५ मीटरपर्यंत वाढली होती. त्यामुळे नंतर धरणाचे सर्व दरवाजे उघडण्यात आले होते. मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, चीनमधील छोट्या-मोठ्या मिळून अशा ४३३ नद्या धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहेत. 

'अमेरिकेत ज्यो बिडेन निवडून आल्यास भारताला फायदा'

पुरामुळे लाखो हेक्टर शेतीचे नुकसान
चीनच्या सरकारी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत ४.३ लाख लोकांना पूर क्षेत्रातून सुरक्षित स्थळी नेण्यात आले आहे. तसेच तेथील ४.५ लाख हेक्टर शेती पूराच्या पाण्याखाली गेली आहे. च्यांगशी प्रांताव्यतिरिक्त हुपेई आणि हुनान प्रांतातही परिस्थिती गंभीर आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: China blasts dam to release floodwaters as death toll rises