अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा मोठे निर्णय घेतले आहेत. जगभरात अमेरिकन चित्रपटांना प्रोत्साहन मिळावं यासाठी परदेशी चित्रपटांवर १०० टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा त्यांनी केलीय. ट्रम्प यांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रूथवर याबाबत जाहीर केलंय. इतकंच नाही तर कुख्यात अलकाट्राज तुरुंग पुन्हा वापरण्याचे आदेश दिले आहेत. १९६३ मध्ये हा तुरुंग बंद करण्यात आला होता. आता कुख्यात आणि धोकादायक कैद्यांना इथं ठेवण्यात येणार आहे.