डोनाल्ड ट्रम्पनी लॉंच केलं स्वतःचं सोशल मीडिया अ‍ॅप, वाचा डिटेल्स

Donald trump has launched truth social as his own social media app check details here
Donald trump has launched truth social as his own social media app check details here

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी त्यांचे ट्रुथ सोशल (Truth Social) नावाचे पहिले सोशल मिडीया अ‍ॅप लाँच केले आहे. नावातचं दिल्याप्रमाणे हे एक सोशल मीडिया अ‍ॅप (Social Media App) आहे, जे सध्या अ‍ॅपल (Apple) च्या अ‍ॅप स्टोअरवरून डाउनलोड करता येईल. दरम्यान जानेवारी 2021 मध्ये फेसबुक आणि ट्विटर सारख्या अनेक प्लॅटफॉर्म्सनी त्यांच्यावर बंदी घातल्यानंतर या अ‍ॅपच्या माध्यमातून ट्रम्प यांची सोशल मीडियाच्या जगात पुनरागमन झाल्याचे बोलले जात आहे.

या सोशल मीडिया अ‍ॅपच्या लॉंच बाबत घोषणा पहिल्यांदा ऑक्टोबर 2021 मध्ये करण्यात आली होती आणि आता ते डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे. मात्र, ते अद्याप Android वापरकर्त्यांसाठी उपलब्ध नाही. ज्या iOS वापरकर्त्यांनी त्यांच्या फोनवर अ‍ॅप इंस्टॉल केले आहे त्यांनी काही अडचणींचा सामना करवा लागत आहे . तर काही जणांना अकाऊंटसाठी रजिस्टर करता येत नाहीये. त्यानंतर वापरकर्त्यांना एका मेसेज पाठवून त्यांना वेटिंग लिस्ट मध्ये ठेवले गेले असल्याचे सांगण्यात येत आहे. त्या मेसेजमध्ये मोठ्या मागणीमुळे, आम्ही तुम्हाला वेटिंग लिस्टमध्ये ठेवले आहे असे सांगण्यात येत आहे.

Donald trump has launched truth social as his own social media app check details here
ड्रायव्हिंग लायसन्स संबंधी महत्त्वाचे; 'या' कामासाठी शेवटची संधी

ट्रुथ सोशल अ‍ॅप म्हणजे काय? फीचर्स काय असतील?

अ‍ॅप स्टोअरवरील ट्रुथ सोशलच्या डिस्क्रिप्शनमध्ये असे म्हटले आहे की, हा एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे जे राजकीय भेदभावापासून मुक्त आहे. येथे कोणीही साइन अप करू शकतो आणि फोटो, बातम्या किंवा व्हिडिओ लिंकवर त्यांचे मत मांडू शकतो.

तुमचे किती फॉलोअर्स आहेत आणि तुम्ही कोणाला फॉलो करताय याची यादी तुम्हाला पाहाता येईल. तसेच अ‍ॅप तुम्हाला तुमच्या पोस्ट आणि लाईक्सचा हिस्ट्री देखील दाखवेल. अ‍ॅपस्टोअरवरील डिस्क्रिप्शननुसार हे प्रोफाइल सेक्सनमध्ये पाहाता येईल या प्लॅटफॉर्मवर, तुम्हाला लोक, संस्था आणि तुम्हाला आवडत असलेल्या न्युज आउटलेटचे लेटेस्ट पोस्ट आणि एक्टिव्हीटीज पाहायला मिळतील. तसेच तुमच्या फीडवर, तुम्ही ज्यांना फॉलो करता त्यांच्या पोस्ट तुम्हाला दिसतील.

Donald trump has launched truth social as his own social media app check details here
Realme घेऊन येतेय जगातील सर्वात फास्ट चार्जिंग फोन, वाचा डिटेल्स

तुम्ही इतर लोकांना किंवा रेग्युलर युजर्स शोधून त्यांना फॉलो करु शकता. अ‍ॅप नोटिफीकेशन फीचर देण्यात आले आहे, त्यामुळे जेव्हा काही अपडेट असेल किंवा तुमच्या पोस्ट पाहिली किंवा वाचली की तुम्हाल नोटिफीकेशन मिळेल. तुम्ही या प्लॅटफॉर्मवर कोणालाही वैयक्तिकरित्या मेसेज पाठवू शकता. अ‍ॅप स्टोअरवर शेअर केलेल्या स्क्रीनशॉटनुसार रीट्विट, कमेंट किंवा पोस्ट लाइक करण्याचे फीचर देखील आहे. हे डार्क मोड तसेच हॅशटॅगला देखील सपोर्ट करते. दरम्यान हे सर्व फीचर एकंदरीत ट्विटर सारखेच वाटत आहेत.

अ‍ॅपलच्या अ‍ॅप स्टोअरवरील अ‍ॅप प्रायव्हसी सेक्शनमध्ये देण्यात आलेल्या माहितीवरुन हे सोशल मीडिया अ‍ॅप डेटा गोळा करण्याच्या बाबतीतल कॉन्टॅक्ट डिटेल्स, वापरकर्त्याची माहिती आणि ब्राउझिंग हिस्ट्री गोळा करते. हे अ‍ॅप iOS 13 किंवा त्यानंतरच्या आवृत्तीवर चालणाऱ्या डिव्हाइससाठी उपलब्ध आहे. तसेच हे मोफत वापरता येणारे अ‍ॅप आहे.

Donald trump has launched truth social as his own social media app check details here
'रेड हार्ट इमोजी' ठरु शकते धोकादायक! होऊ शकतो कारावास अन् दंडही

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com