वॉशिंग्टन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर ५० टक्के टॅरिफ (आयात शुल्क) लावल्यामुळे रशियाच्या अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसेल, असे म्हटले आहे. अलास्का येथे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यासोबत होणाऱ्या भेटीपूर्वी त्यांनी हे मोठे विधान केले आहे.