अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी एक मोठा दावा केला. ट्रम्प यांनी म्हटले आहे की, इस्रायलने ६० दिवसांच्या युद्धबंदी प्रस्तावाला सहमती दर्शवली आहे. गाझामध्ये सुरू असलेल्या रक्तरंजित संघर्षाला तात्पुरते थांबवण्याच्या दिशेने हा प्रस्ताव एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे, ज्यामध्ये आतापर्यंत ५८,००० हून अधिक पॅलेस्टिनी मारले गेले आहेत. ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'ट्रुथ सोशल' द्वारे याची घोषणा केली आहे.