

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारताच्या चिंता सतत वाढवत आहेत. नुकतेच पंतप्रधान मोदी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली आणि दोन्ही देशांमधील चांगल्या संबंधांबद्दल चर्चा केली. याशिवाय, त्यांनी ट्रम्प यांना आपला मित्रही म्हटले. पण ट्रम्प भारतासह संपूर्ण जगाला टॅरिफच्या इशारा देऊन घाबरवत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी एप्रिलपासून 'परस्पर शुल्क' (Reciprocal Tariffs) लागू करण्याचा इशारा दिला आहे. या धोक्यामुळे भारतातील अनेक निर्यात क्षेत्रांमध्ये चिंता वाढली आहे. असे झाल्यास भारतीय अर्थव्यवस्थेला दरवर्षी सुमारे ७ अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे ५८००० कोटी रुपयांचे नुकसान होईल, असे मानले जात आहे.