esakal | हट्टी ट्रम्प यांची 900 बिलियन डॉलरच्या बिलावर सही, नागरिकांचा चेक वटण्याचा मार्ग मोकळा
sakal

बोलून बातमी शोधा

donald trump,  covid 19 relief bill , US, America

कोरोना विषाणूचा सर्वाधिक फटका हा अमेरिकेला बसला आहे. अमेरिकेत सर्वाधिक लोकांनी कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागलाय. एवढेच नाही तर अर्थव्यवस्थालाही मोठी झळ बसली आहे.

हट्टी ट्रम्प यांची 900 बिलियन डॉलरच्या बिलावर सही, नागरिकांचा चेक वटण्याचा मार्ग मोकळा

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

Donald Trump Signed Covid 19 Relief Bill : अमेरिकेचे  राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी  (Donald Trump)  900 बिलियन डॉलरच्या कोविड-19 मदत निधीच्या विधयकावर अखेर स्वाक्षरी केली आहे. व्हाइट हाउसने यासंदर्भातील माहिती दिली आहे. या पॅकेजमुळे कोरोना काळात नोकरी गमावलेल्यांना दिलासा मिळणार आहे. या विधेयकाला मंजूरी देण्याचे सोडून डोनाल्ड ट्रम्प गोल्फ खेळण्यात व्यस्त दिसले होते. यावरुन त्यांच्यावर चौहू बाजूनी टीकाही झाली. अखेर त्यांना विधेयकावर स्वाक्षरी करण्यास वेळ मिळाला. आठवड्याभराच्या विलंबानंतर अमेरिकन नागरिकांना दिलासा देणाऱ्या विधेयकाला मंजूरी मिळाली. 

कोरोना विषाणूचा सर्वाधिक फटका हा अमेरिकेला बसला आहे. अमेरिकेत सर्वाधिक लोकांनी कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागलाय. एवढेच नाही तर अर्थव्यवस्थालाही मोठी झळ बसली आहे. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या असून त्यांच्यावर बेरोजगारीचे संकट कोसळले आहे. कोरोनाच्या संकटातून जनतेला बाहेर काढण्याच्या उद्देशाने अमेरिकन सरकारने विशेष पॅकजची घोषणा केली 900 बिलियन डॉलरच्या या पॅकेजच्या माध्यमातून नागरिकांना मदत दिली जाणार आहे. 

अमेरिकन लोकांसाठी पॅकेजला मंजुरी द्यायची सोडून ट्रम्प गेले गोल्फ खेळायला

अमेरिकेला कोरोनाचा सर्वाधिक दणका बसल्यानंतर नागरिकांच्या हितासाठी काही निर्णय सरकार घेत असताना ट्रम्प यांनी आपला हट्टीपणा दाखवला होता. ट्रम्प आपल्या जबाबदाऱ्या सोडून गोल्फ खेळत ख्रिसमस साजरा करण्यात व्यस्त दिसले होते. सरकारी निधीवर स्वाक्षरी करायची सोडून ट्रम्प पाम बिचवर सुट्टीसाठी गेले होते.कोरोनाच्या संकटात दिल्या जाणाऱ्या मदतीला रोखण्याचा या प्रकारावरुन चौहू बाजूंनी त्यांच्यावर टीकाही झाली होती.  
 

जगभरात 8 कोटीहून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली असून  17.57 लाख लोकांनी कोरोनामुळे जीव गमावला आहे. अमेरिकेत सर्वाधिक 1.89 COVID-19 चे रुग्ण आढळले असून 3 लाखहून अधिक लोकांचा याठिकाणी मृत्यू झाला आहे.

loading image
go to top