ट्रम्प आणि पुतीन यांच्यात शनिवारी होणार चर्चा

वृत्तसंस्था
शुक्रवार, 27 जानेवारी 2017

वॉशिंग्टन- अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी उद्या (शनिवारी) चर्चा करणार आहेत. 

अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीत रशियाने ईमेल हॅकिंगच्या माध्यमातून ढवळाढवळ केल्याचा आरोप अमेरिकेतील डेमॉक्रॅटिक या विरोधी पक्षाने केला होता. त्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात खळबळ उडाली होती. जगभरात हा राजकीय चर्चेचा विषय बनला होता. त्यानंतर रशियाशी मैत्रीपूर्ण संबंध वाढविण्याचे सूतोवाच अध्यक्ष ट्रम्प यांनी केले. या पार्श्वभूमीवर ट्रम्प आणि पुतीन यांच्यात काय चर्चा होणारा याकडे आता जगाचे लक्ष लागले आहे. 

ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतल्यानंतर ते प्रथमच पुतीन यांच्याशी संवाद साधणार आहेत. यापूर्वी ट्रम्प यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधला. भारत हा अमेरिकेचा खरा मित्र असल्याचे सांगून, पंतप्रधान मोदींना वर्षअखेरीस अमेरिका भेटीला येण्याचे निमंत्रणही ट्रम्प यांनी दिले. 
 
Web Title: donald trump to speak with vladimir putin