अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या हितांविरोधात असलेल्या आंतरराष्ट्रीय संघटना, करार आणि संधी यातून बाहेर पडण्याचे आदेश देणाऱ्या मेमोरेंडमवर सही केलीय. ट्रम्प प्रशासनाकडून अमेरिका फर्स्ट धोरण स्वीकारत भारत आणि फ्रान्सच्या नेतृत्वाखालील इंटरनॅशनल सोलर अलायन्ससह ६६ जागतिक संस्थांमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलाय. व्हाइट हाऊसने या संघटनांना अमेरिकेच्या स्वायत्तता आणि आर्थिक हितांच्या विरोधात असल्याचं म्हटलंय.