ट्रम्प यांनी भारताचे नाकारले निमंत्रण

वृत्तसंस्था
रविवार, 28 ऑक्टोबर 2018

नवी दिल्लीतील प्रजासत्ताक दिनी संचलन कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्यासाठी दिलेले निमंत्रण अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नाकारले आहे. या संदर्भात अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना पत्र दिले आहे. या पत्राच्या माध्यमातून ट्रम्प यांनी न येण्याबद्दल खेद व्यक्त केला आहे.
 

नवी दिल्ली : नवी दिल्लीतील प्रजासत्ताक दिनी संचलन कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्यासाठी दिलेले निमंत्रण अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नाकारले आहे. या संदर्भात अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना पत्र दिले आहे. या पत्राच्या माध्यमातून ट्रम्प यांनी न येण्याबद्दल खेद व्यक्त केला आहे.

ट्रम्प यांनी निमंत्रण नाकारण्याची काही कारणे सांगितली आहेत. 26 जानेवारीच्या अगोदर किंवा नंतर काही राजकीय राजनैतिक कार्यक्रम आणि स्टेट ऑफ युनियनमध्ये भाषण निश्‍चित होऊ शकते, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. याबाबत ट्रम्प यांनी घेतलेली भूमिका तत्कालीन अध्यक्ष बराक ओबामा यांच्याविरुद्ध आहे. 2015 मध्ये अनेक घरगुती कार्यक्रम असतानाही प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला ते हजर राहिले होते.

रशियाबरोबर भारताचा संरक्षण करार आणि इराणमधून तेलाची आयात या कारणावरून भारत आणि अमेरिका यांच्यात तणाव निर्माण झालेला असताना ट्रम्प यांनी प्रजासत्ताक दिनाचे निमंत्रण नाकारल्याचे वृत्त धडकले आहे. या पत्राबरोबरच ट्रम्प भारतात येणार की नाही या संदर्भात बऱ्याच काळापासून सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. भारताकडून त्यांना फेब्रुवारीत निमंत्रण पाठण्यात आले होते, मात्र अमेरिकेने ते निमंत्रण स्वीकारले नाही. पुढील वर्षी लोकसभेच्या निवडणुका होत असल्याने ट्रम्प यांनी भारताचे निमंत्रण नाकारल्याचे बोलले जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Donald Trump turns down India's invitation for Republic Day