
America Latest News: अमेरिकेत चाललेल्या सरकारी शटडाऊनदरम्यान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठ्या संख्येने कर्मचारी कपात करण्याची घोषणा केली. देशभरात विविध विभागांमध्ये काम करणाऱ्या हजारो कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं जात असल्याचं व्हाईस हाऊटने म्हटलं आहे. ट्रम्प यांनी या निर्णयासाठी डेमोक्रॅट्सला दोषी ठरवलं आहे.