

Carnegie survey declining Republican support Indian Americans over Trump's immigration policies - AI Image
esakal
Washington: अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय वंशाच्या अमेरिकी मतदारांचा रिपब्लिकन पक्षाकडील कल कमी झाल्याचे एका नव्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्थलांतरविषयक धोरणांबाबत, विशेषतः H-1B व्हिसा आणि जन्माधारित नागरिकत्वाच्या मुद्द्यांवर भारतीय अमेरिकन समुदायात नाराजी असल्याचे कार्नेगी एंडोमेंट फॉर इंटरनॅशनल पीसच्या सर्वेक्षणात दिसून आले आहे. या मतदारांमध्ये डेमोक्रॅटिक पक्षाला पुन्हा पाठिंबा वाढल्याचेही आकडेवारी सांगते.