

US President Donald Trump announces a new trade investigation targeting India and other major economies, potentially leading to additional tariffs and stricter trade measures.
esakal
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने १६ प्रमुख व्यापारी भागीदार देशाच्या व्यापार धोरणांची आणि कार्यपद्धतींची एक नवीन चौकशी सुरू केली आहे; ही धोरणे अन्यायकारक आहे असं अमेरिकेचे म्हणणं आहे. या कृतीमुळे भारतसह अनेक देशांवर अतिरिक्त टॅरिफ आणि इतर निर्बंध लादण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. हा निर्णय अशा वेळी घेण्यात आला आहे, जेव्हा सर्वोच्च न्यायालयाने ट्रम्प यांनी यापूर्वी लादलेली शुल्कवाढ रद्द केल्यानंतर, ट्रम्प प्रशासन नवीन पर्यायांचा शोध घेत आहे.