
अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प २० जानेवारीला राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेणार आहेत. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या या शपथविधी सोहळ्यात जगभरातून अनेक नेते सहभागी होणार आहेत. भारतालाही शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण मिळालंय. भारताकडून प्रतिनिधी म्हणून परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर हे शपथविधी सोहळ्यात सहभागी होतील.