Drinks : तरूणांनो जास्तीत जास्त दारू प्या; जपान सरकारचे अजब आवाहन

आरोग्याच्या दृष्टीने दारूचे अति सेवन हानिकारक मानले जाते.
Alcohol
Alcohol Sakal
Updated on

Drink More-Boost Economy : आरोग्याच्या दृष्टीने दारूचे अति सेवन हानिकारक मानले जाते, यासाठी दारूच्या अति आहारी न जाण्याचा सल्ला नागरिकांना दिला जातो. एवढेच नव्हे तर, व्यसनांपासून दूर राहण्यासाठी सरकारकडूनही विविध कार्यक्रम राबवल्या जातात. मात्र, जपान सरकारने दारूच्या व्यसनापासून तरूणांना दूर राहण्याचे आवाहन करण्याऐवजी त्यांनी जास्तीत जास्त दारूचे सेवन करण्याचे अजब आवाहन केले आहे. जाणून घेऊया जपान सरकार असे आवाहन का केले आहे?

Alcohol
Manish Sisodia : सीबीआय आई है! कारवाईनंतर दिल्लीच्या उपमुख्यमंत्र्यांचे ट्वीट

जपानमधील सध्याची पिढी त्यांच्या वडीलधारी किंवा पूर्वजांपेक्षा दारूचे सेवन कमी प्रमाणात करत असल्याचे निदर्शनात आले आहे. त्यामुळे दारूच्या माध्यमातून मिळणाऱ्या कराच्या रकमेत कमी आली आहे. त्यामुळे महसुलात होणारी घट जपान सरकारची डोकेदुखी ठरू लागली आहे. त्यामुळे तरूणांनी जास्तीत जास्त दारूचे सेवन करावे यासाठी सरकारने काही कल्पना मागवल्या आहेत.

राष्ट्रीय स्पर्धेच्या माध्यमातून सरकारने ही कल्पना मागवली आहे. या स्पर्धेसाठी पुरस्कार दिला जाणार आहे. तरुण पिढीमध्ये अधिक मद्यपान केल्याने जपानच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, असा सरकारचा विश्वास आहे. जाहीर करण्यात आलेल्या या स्पर्धेत सहभागींना जास्त मद्य सेवन, आकर्षक ब्रँडिंग आणि उद्योगांना प्रोत्साहन देण्याबाबत मुख्य कल्पना द्याव्या लागणार आहे.

Alcohol
अन् पंकजा मुंडेंनी भाऊ धनंजय मुंडेनंतर बदलला आपला ProfilePic

या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत 20 ते 39 वयोगटातील युवक सहभागी होऊ शकणार असून, स्पर्धकांना त्यांच्या पिढीत दारूची विक्री कशी वाढवता येईल याबाबत सांगावे लागणार आहे. सरकारच्या या अजब आवाहनावर काही टीकांसह संमिश्र प्रतिक्रिया आल्याचे जपानी माध्यमांनी म्हटले आहे. अनेक जण सरकारच्या या योजनेवर सोशल मीडियावरही आपली मते व्यक्त करत आहेत.

टॅक्स एजन्सीच्या अलीकडील आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की, 1995 च्या तुलनेत 2020 मध्ये लोक कमी दारू पीत आहेत. यामुळे अंदाजे मद्य सेवन एक चतुर्थांशने कमी झाले आहे. जपान टाइम्स वृत्तपत्रानुसार, 1980 मध्ये एकूण महसुलाच्या 5 टक्के कर मद्याच्या माध्यमातून गोळा झाला होता. तर 2020 मध्ये हा आकडा केवळ 1.7 टक्क्यांवर नोंदवण्यात आला आहे.

Alcohol
"एका गुंडाला वाचवण्यासाठी..."; मनीष सिसोदिया यांचा भाजपवर निशाणा

जागतिक बँकेच्या मते, जपानमधील लोकसंख्येपैकी एक तृतीयांश (29%) लोकसंख्या 65 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाची आहे. त्यामुळे जपानची चिंता केवळ अर्थव्यवस्थेची नसून, नोकऱ्या, तरुण कर्मचाऱ्यांचा पुरवठा, भविष्यात वृद्धांची काळजी आदी समस्यादेखील त्या सोडवण्यासाठीदेखील जपान सरकारकडून नियोजन केले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com