Pankaja Munde|अन् पंकजा मुंडेंनी भाऊ धनंजय मुंडेनंतर बदलला आपला ProfilePic | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Panakaja Munde And Dhananjay Munde Change Twitter Profile Picture

अन् पंकजा मुंडेंनी भाऊ धनंजय मुंडेनंतर बदलला आपला ProfilePic

भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे हे कट्टर राजकीय विरोधक आहेत. त्यामुळे दोघांच्यातही चांगलाच कलगीतुरु रंगलेला असतो. मात्र, राजकारणाचा विषय सोडला तर इतर बाबतीत या दोन्ही भावा-बहिणीने सलोख्याचेच नाते जपले आहे. सध्या सोशल मीडियावर दोघांचीही एक वेगळीच चर्चा रंगली आहे. दोघांनी एकाच दिवशी आपल्या सोशलचा प्रोफाईल फोटो बदलल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.(Panakaja Munde And Dhananjay Munde Change Twitter Profile Picture)

पंकजा मुंडें आणि धनंजय मुंडें दोघेही सोशल मीडियावर नियमतीत सक्रीय असतात. त्यांच्या पोस्ट मोठ्याप्रमाणात कार्यकर्ते शेअर करत असतात. पंकजा मुंडे यांचे फॉलोवर सुमारे सात लाख पन्नास हजार आहेत. तर धनंजय मुंडे यांचे फॉलोवर आठ लाख 50 हजार आहेत.

दरम्यान, दोघांनी ट्विटरचा प्रोफाईल पीक बदलला आहे. विशेष म्हणजे दोघांनीही एकच कॅप्शन दिली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर याची चांगलीच चर्चा रंगली. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांचा येथेही सामना रंगल्याचे कार्यकर्त्यांनी म्हटले. धनंजय यांच्या फोटोला दोन हजार पेक्षा जास्त लाईक्स मिळाल्या आहेत. कार्यकर्त्यांनी त्यांच्या फोटोलाही जोरदार लाईक्स आणि शेअर केले आहे.

तसेच पंकजा यांच्या नव्या प्रोफाईल फोटोला त्यांच्या समर्थकांकडून लाईक्सचा वर्षाव होताना दिसत आहे.

दोघांनी प्रोफाईल पीक बदलताना #NewProfilePic अशी एकच कॅप्शन दिल्याने चर्चेला चांगलाच वाव मिळाला आहे. दोन्ही नेते नियमीत राजकीय मैदानात एकमेकांवर जोरदार हल्लाबोल करत असतात. बीड जिल्ह्याच्या राजकारणात वर्चस्व सिद्ध करण्याचा दोघांचाही प्रयत्न असतो. तसाच काहीचा प्रत्येय आज ट्वीटरवरही आला. असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

Web Title: Panakaja Munde And Dhananjay Munde Change Twitter Profile Picture

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..