आरोपीने केलं दुसऱ्या संधीचं सोनं; त्याच न्यायाधीशांसमोर आला वकील बनून

अमली पदार्थाची विक्री करणाऱ्या गुन्हेगाराला न्यायाधीशांनी दिली दुसरी संधी
आरोपीने केलं दुसऱ्या संधीचं सोनं; त्याच न्यायाधीशांसमोर आला वकील बनून

प्रत्येकाला आयुष्य जगायची दुसरी संधी मिळायला हवी असं आपण अनेकदा ऐकतो. त्या व्यक्तीने जर का या संधीचं सोनं केलं तर पश्चात्ताप करण्याची वेळ येत नाही. याचीच प्रचिती अमेरिकेत घडलेल्या एका घटनेवरून येते. 16 वर्षांपूर्वी म्हणजेच २००५ साली न्यायाधीश ब्रुस मॉरो Bruce Morrow यांच्या न्यायालयात एक तरुण आरोपी आला. अमली पदार्थाची विक्री केल्याप्रकरणी एडवर्ड मार्टेल Edward Martell या तरुणाला अटक करण्यात आली होती. अमेरिकन कायद्याप्रमाणे त्याला कठोर शिक्षा झाली असती आणि जवळपास २० वर्ष तो तुरुंगातच असता. पण न्यायाधीश ब्रुस यांनी न्यायदान करताना त्या आरोपीला संधी देण्याचं ठरवलं. (drug dealer got a second chance from judge now he is practicing law)

न्यायाधीशांनी आरोपीला तीन वर्षांसाठी तुरुंगात पाठवलं. मात्र त्यासोबतच त्यांनी त्याला एखाद्या कंपनीचं सीईओ होऊन दाखवण्याचं चॅलेंज दिलं. शिक्षेचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर एडवर्डसमोर खरं आव्हान होतं. गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याने एडवर्डला महाविद्यालयात आणि तेही वकिलीचं शिक्षण घेता येईल की ही शंकाच होती. पण एडवर्ड खचला नाही. तो जिद्दीने प्रत्येक समस्येतून मार्ग शोधत पुढे गेला. विशेष म्हणजे पदवीसाठी त्याने स्कॉलरशिपही मिळवली होती.

आरोपीने केलं दुसऱ्या संधीचं सोनं; त्याच न्यायाधीशांसमोर आला वकील बनून
तुम्हाला माहीत आहे का? लंडन ते कोलकता बसने प्रवास करता येत होता !

वकिलीचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी मिशिगन बार काऊन्सिलच्या अटीनुसार उमेदवाराची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसावी. त्याने कॅरेक्टर आणि फिटनेस आढावा यात उत्तीर्ण होणे बंधनकारक होते. एडवर्ड हा अमली पदार्थाची विक्री करणारा सराईत गुन्हेगार होता. ‘मी स्वप्न पूर्ण करण्यामागे धावत होतो का, पण ते पूर्ण होतील का याची खात्री नव्हती, असं तो सांगतो. बार काऊन्सिलच्या समितीसमोर त्याने तब्बल १२०० पानी अर्ज दिला. यात त्याने भूतकाळातील घटनाक्रम सविस्तर सांगितला होता. तसंच आता अमली पदार्थाचे सेवनही करत नसल्याचं त्याने सांगितले.

अशा अनेक परीक्षा पास करत एडवर्ड वकील झालाय. एडवर्डला या सगळ्या काळात न्यायाधीश मॉरो यांनी देखील मोलाचं मार्गदर्शन केलं. प्रत्येकाला शेवटी प्रेम हवंच असतं, असं न्यायाधीश सांगतात. आयुष्यात प्रत्येकाला संधी मिळते. त्या संधीचं सोनं करणं हे त्या व्यक्तीच्या हाती असतं, हाच संदेश या घटनेतून मिळतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com