Video : समुद्रात पोलिस अन् तस्करांचा थरार अऩ्...

 Drug smugglers arrested after helping to rescue drowning police
Drug smugglers arrested after helping to rescue drowning police

माद्रिद (स्पेन): समुद्रामध्ये स्पेनच्या तटरक्षक दलाच्या तस्करांचा पाठलाग सुरू केला. मात्र, पोलिसांची बोट पटली झाली अन् बुडाली. पण, तस्करांनीच पोलिसांचा जीव वाचवला. समुद्रामध्ये पोलिस अन् तस्करांचा थरारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

स्पेनच्या दक्षिणेकडील समुद्रात शुक्रवारी (ता. 4) ही घटना घडली. स्पेनच्या तटरक्षक दलाच्या तीन पोलिसांनी तस्करांच्या बोटीचा पाठलाग सुरू केला. तस्कर पुढे आणि तटरक्षक दलाचे पोलिस मागे मागे. समुद्रामध्ये मोठा थरार सुरू होता. अखेर पोलिसांची बोट तस तस्करांच्या बोटीला आदळली आणि पलटी झाली. तस्करांनी हे पाहून बोटीचा वेग वाढवला आणि पुढे जाऊ लागले. मात्र, त्यांच्या डोक्यावर हेलिकॉप्टर आले होते.  हेलिकॉप्टरमध्ये तटरक्षक दलाची दुसरी टीम होती. त्यांनी पोलिसांची बोट बुडाल्याचे पाहिले होते. हेलिकॉप्टरमधील पोलिसांनी स्पीकरवरून पाण्यात पडलेल्या पोलिसांना वाचविण्याचे तस्करांना आवाहन केले.

तस्करांनी त्यांची बोट अपघातस्थळाकडे वळवली. एकेक करून पाण्यात बुडणाऱ्या तिन्ही पोलिसांना त्यांनी त्यांच्या बोटीवर घेतले. यामुळे पाण्यात बुडणाऱया पोलिसांचे प्राण वाचले. तस्करांनी वाचविल्यानंतर पोलिसांनी त्यांचे आभार मानले आणि लगेचच हँड्स अप म्हणत अटक केली. यानंतर पोलिसांनी बोटीची तपासणी केली. यामध्ये मोठ्या प्रमाणावर नशेचे पदार्थ आढळून आले. तस्करांनी 3,000 किलो अंमली पदार्थ ताब्यात घेतले.या सर्व घटनेचा व्हिडीओ हेलिकॉप्टरमधून रेकॉर्ड करण्यात आला  आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com