Dubai Airport Drone Attack : दुबई विमानतळावर इराणचा ड्रोन हल्ला ! आकाशात धुराचे लोट, विमानसेवा विस्कळीत

Middle East Tensions : प्राथमिक माहितीनुसार या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झाल्याची नोंद नाही.हल्ल्यानंतर आकाशात काळ्या धुराचे मोठे लोट दिसत असून परिसरात आपत्कालीन कारवाई सुरू आहे.
Smoke rises near Dubai International Airport after a drone-related incident reportedly hit a fuel tank, causing a fire and temporarily disrupting flight operations.

Smoke rises near Dubai International Airport after a drone-related incident reportedly hit a fuel tank, causing a fire and temporarily disrupting flight operations.

esakal

Updated on

Dubai International Airport Attack : अमेरिका,इस्रायल आणि इराण यांच्यातील वाढता संघर्ष आता आखाती प्रदेशातील अत्यंत महत्त्वाच्या शहरांपर्यंत पोहोचत असल्याचे दिसून येत आहे. दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर हल्ला करण्यात आला असून, त्यामुळे तिथे आग भडकली आहे. यापूर्वी, स्थानिक वृत्तांनुसार रविवारी दुबई आणि कुवेत या दोन्ही ठिकाणच्या विमानतळांवर ड्रोन हल्ले करण्यात आले त्यानंतर या दोन्ही ठिकाणी स्फोट झाल्याच्या आणि आगी लागल्याच्या बातम्या आल्या होत्या. जरी प्राथमिक वृत्तांमध्ये कोणत्याही मोठ्या जीवितहानीची पुष्टी करण्यात आली नसली, तरी आकाशात काळ्या धुराचे लोटच्या लोट उसळताना स्पष्टपणे दिसत आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com