गर्भवतींसाठी लस धोकादायक! WHO ने मॉडर्नाच्या व्हॅक्सिनबाबत दिला सल्ला

टीम ई सकाळ
Thursday, 28 January 2021

जगभरात कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी लसीकरण मोहिम सुरू झाली आहे. काही देशांमध्ये व्हॅक्सिनला विरोधही केला जात आहे. दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेनं मॉडर्नाच्या व्हॅक्सिनबाबत इशारा दिला आहे.

कॅलिफोर्निया - जगभरात कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी लसीकरण मोहिम सुरू झाली आहे. काही देशांमध्ये व्हॅक्सिनला विरोधही केला जात आहे. दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेनं मॉडर्नाच्या व्हॅक्सिनबाबत इशारा दिला आहे. गर्भवती महिलांनी मॉडर्नाची लस घेऊ नये असं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे. कोरोनाचा जास्त धोका असेल तरच लस घ्या असंही WHO ने सांगितलं आहे. 

स्तनपान करणाऱ्या मातांना कोरोनाची लस देता येईल असं जागतिक आरोग्य संघटनेनं सांगितलं. जगभरात मॉडर्ना, एस्ट्राझेनका, भारत बायोटेक कंपन्यांची लस दिली जात आहे. WHO ने मंगळवारी एक रिपोर्ट प्रसिद्ध करून सांगितलं की, गर्भवती असलेल्या महिला कोरोनाच्या विळख्यात सापडण्याचा धोका अधिक आहे. मात्र सध्या गर्भवती महिलांनी लस घेऊ नये. त्यांना जर कोरोनाचा धोका जास्त असेल तरच लस घ्यावी असाही सल्ला देण्यात आला आहे. तज्ज्ञांनी आता गर्भवती महिलांना सल्ला देताना म्हटलं आहे की, कोरोना रुग्णांच्या वॉर्डमध्ये ड्युटी असलेल्या गर्भवती कर्मचाऱ्यांनीच ही लस घ्यावी. 

हे वाचा - फेब्रुवारीमध्ये होणार 5 मोठे बदल; वाचा सर्वसामान्यांवर काय होईल परिणाम?

लसीकरणाबाबत स्ट्रॅटेजिक अॅडव्हायजरी ग्रुप ऑफ एक्सपर्टच्या एका मिटींगमध्ये संचालक काटे ओब्रायन यांनी जागतिक आरोग्य संघटनेच्या निर्णयावर चिंता व्यक्त केली. ते म्हणाले की, याचा विचार करण्याचं काहीच कारण नाही की गर्भावस्थेत काही त्रास होऊ शकतो. सध्या आपल्याकडे अशा प्रकारचा कोणताच डेटा नाही असं मानून आपण पुढे जात आहोत. जगातील काही ठिकाणी मॉडर्ना लसीचा दुसरा डोस देण्याची तयारी केली जात आहे.

हे वाचा - लस पुरवठा नियोजनाचे ॲस्ट्राझेनेकाकडून समर्थन

अधिकृतपणे आरोग्य तज्ज्ञांनी मॉडर्नाच्या दुसऱ्या लशीची मोहिम सुरु करण्यास सांगितलं आहे. लसीचा पहिला डोस दिल्यानंतर 28 दिवसांनी दुसरा डोस दिला जातो. मात्र काहीवेळा हा कालावधी वाढवून 42 दिवसांपर्यंत केला आहे. सध्या 28 दिवसांच्या अंतराने 100 मायक्रोग्रॅमचा डोस दिला जात आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: who recommends against moderna vaccines for pregnant women