मागण्या मान्य न झाल्यास कतारला एकटे पाडणार

वृत्तसंस्था
रविवार, 25 जून 2017

संयुक्त अरब अमिरातीचा इशारा

दुबई: अरब देशांनी बहिष्कार उठवण्यासाठी कतारपुढे ठेवलेल्या मागण्या मान्य न झाल्यास कतारला एकटे पाडू, असा इशारा संयुक्त अरब अमिरातीने दिला आहे.

याबाबत आज बोलताना संयुक्त अरब अमिरातीचे परराष्ट्रमंत्री अन्वर गरगश म्हणाले, "कतारने दहा दिवसांत मागण्या पूर्ण न केल्यास कतारला अरब देशांकडून आणखी एकटे पाडले जाईल. कतारसोबत राजनैतिक संबंध कायम ठेवण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. मात्र, वादातून मार्ग काढण्यासाठी करण्यात आलेल्या मागण्या जाहीर करण्यात आल्याने मध्यस्थीचे प्रयत्न निष्फळ ठरल्याचे दिसत आहे.''

सौदी अरेबिया, इजिप्त, बहारीन आणि संयुक्त अरब अमिराती यांनी कतारवर बहिष्कार टाकला आहे. हा बहिष्कार उठवण्यासाठी या देशांनी कतारपुढे 13 मागण्या ठेवल्या आहेत. यात "अल जझिरा' वृत्तवाहिनी बंद करणे, इराणशी सर्व संबंध तोडणे आणि तुर्कस्तानचा कतारमधील लष्करी तळ बंद करणे, अशा प्रमुख मागण्यांचा समावेश आहे. कतारमधील सरकारी सूत्रांनी या मागण्या पूर्ण होणे शक्‍य नसल्याचे सूतोवाच केले आहे.

Web Title: dubai news arab countries and qatar