'यूएई'तील भारतीयाला 50 लाख दिरमची लॉटरी

वृत्तसंस्था
सोमवार, 7 ऑगस्ट 2017

दुबई : अबूधाबीतील एका बांधकाम क्षेत्रातील कंपनीत तपासणीस म्हणून काम करणाऱ्या कृष्णम राजू थोकाचिचू या भारतीय नागरिकास तब्बल 50 लाख दिरमची लॉटरी लागली.

दुबई : अबूधाबीतील एका बांधकाम क्षेत्रातील कंपनीत तपासणीस म्हणून काम करणाऱ्या कृष्णम राजू थोकाचिचू या भारतीय नागरिकास तब्बल 50 लाख दिरमची लॉटरी लागली.

अबूधाबी आंतरराष्ट्रीय विमानतळावर काढण्यात आलेल्या बिग-5 तिकीट ड्रॉमध्ये कृष्णम याने ही रक्कम जिंकली. भारतीय चलनानुसार, या रकमेचे मूल्य 13 लाख रुपये आहे. मी नेहमी माझ्या मित्रांसह लॉटरीची तिकिटे खरेदी करतो. मात्र, या वेळी मी स्वतः तिकिटाची पूर्ण पैसे मोजले होते; आणि मी भाग्यवान ठरलो, अशी प्रतिक्रिया कृष्णम यांनी दिली.

Web Title: dubai news uae indian wins lottery

टॅग्स