esakal | दुबईच्या शासकाच्या पत्नीचे बॉडीगार्डसोबत अफेअर? गप्प राहण्यासाठी दिले 12 कोटी
sakal

बोलून बातमी शोधा

dubai sheikh mohammad

राजकुमारी हया ही दुबईचे शासक शेख मोहम्मद बिन राशिद अल मकतूम यांची सहावी आणि सर्वात कमी वयाची पत्नी होती.

दुबईच्या शासकाच्या पत्नीचे बॉडीगार्डसोबत अफेअर? गप्प राहण्यासाठी दिले 12 कोटी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

दुबई - दुबईचे शासक शेख मोहम्मद बिन राशिद अल मकतूम यांच्या राजकुमारी पत्नीचे बॉडीगार्डसोबत संबंध होते. या प्रकरणात राजकुमारी हयाने या संबंधाबाबत कुठेही वाच्यता करू नये यासाठी बॉडीगार्डला 12 कोटी रुपये दिले होते. ब्रिटनच्या न्यायालयात सुरु असलेल्या सुनावणीच्या आधारावर डेलीमेलने हा दावा केला आहे. दुबईचे शासक शेख मोहम्मद यांनी राजकुमारी हयाला न सांगताच शरिया कायद्यानुसार फेब्रुवारी 2019 मध्ये तलाक दिला होता. 

राजकुमारी हयाचा बॉडिगार्ड विवाहित होता. मात्र अफेअरमुळे बॉडीगार्डचे लग्न मोडले होते. राजकुमारी हयाने दुबई सोडली असून अनेक वर्षांपासून ब्रिटनमध्ये राहत आहे. मुलांच्या कस्टडीसाठी राजकुमारी हयाने ब्रिटनच्या न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने हयाच्या बाजुने निकाल देत मुलांची कस्टडी दिली होती. 

हे वाचा - पाकिस्तानात सापडलं 1300 वर्षे जुनं मंदिर; हिंदू शाही काळाच्या खाणाखुणा अजूनही ताज्या

बॉडीगार्डला राजकुमारी हया महागडी गिफ्ट देत होती. यामध्ये 12 लाखांचे घड्याळ आणि 50 लाखांच्या बंदुकीचाही समावेश होता. राजकुमारी हया ही दुबईचे शासक शेख मोहम्मद बिन राशिद अल मकतूम यांची सहावी आणि सर्वात कमी वयाची पत्नी होती. तिचे अफेअर 2016 मध्ये सुरू झालं होतं. त्यावेळी बॉडीगार्ड राजकुमारीसाठी काम करत होता. 

राजकुमारी हयाचे वय 46 असून ब्रिटनचा असलेला 37 वर्षीय बॉडीगार्ड रसेल फ्लॉवरसोबत तिचे दोन वर्षांपर्यंत अफेअर होते अशी माहिती समजते. असंही सांगितलं जातं की, राजकुमारी हयाने तिच्या इतर बॉडीगार्डना रसेलसोबत असलेल्या नात्याबद्दल तोंड बंद ठेवण्यासाठी कोट्यवदी रुपये दिले होते. 

हे वाचा - केबल ऑपरेटरने केली महिला डॉक्टरची हत्या; अफेअरच्या वादातून हत्येचा संशय

2018 मध्ये राजकुमारी हया दुबईतून पळाली होती आणि सध्या लंडनमध्ये राहते. डेली मेलने असं म्हटलं की, जेव्हा बॉडीगार्ड रसेल फ्लॉवरशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. तसंच दुसरीकडे राजकुमारी हयासुद्दा रसेलसोबतच्या अफेअरबाबत असलेले दावे फेटाळून लावत आहे.