esakal | पाकिस्तानात सापडलं 1300 वर्षे जुनं मंदिर; हिंदू शाही काळाच्या खाणाखुणा अजूनही ताज्या
sakal

बोलून बातमी शोधा

pakistan temple

हे मंदिर तब्बल 1300 वर्षे जुने आहे. 

पाकिस्तानात सापडलं 1300 वर्षे जुनं मंदिर; हिंदू शाही काळाच्या खाणाखुणा अजूनही ताज्या

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

कराची : भारतीय संस्कृती ही अत्यंत  जुनी संस्कृती मानली जाते. अनेक शतकांपासून भारतीय संस्कृती चालत आली आहे. सध्याच्या भारतापुरती आपली ही भारतीय संस्कृती कधीच मर्यादीत नव्हती. या संस्कृतीचे अवशेष जगाच्या कानाकोपऱ्यात सापडतात. भारताच्या सध्याच्या भौगोलिक सीमेच्या पलिकडेही भारतीय संस्कृती पोहोचली आहे. आधी एकत्र असणारा आणि फाळणीनंतर आता वेगळ्या झालेल्या भूप्रदेशात हिंदू संस्कृतीचे आजही अवशेष सापडतात. अशीच एक घटना आता समोर आली आहे. पाकिस्तानमधील स्वात जिल्ह्यामधील एका पर्वतावर एक हिंदू मंदिर सापडलं आहे. हे मंदिर तब्बल 1300 वर्षे जुने आहे. 

हेही वाचा - "धार्मिक कट्टरता आणि आक्रमक राष्ट्रवाद या दोन महामारींनी देश ग्रस्त"

पाकिस्तान आणि इटलीच्या पुरातत्त्वतज्ज्ञांनी हे हिंदू मंदिर शोधलं आहे. हे मंदिर भगवान विष्णूचं असल्याचं म्हटलं जात आहे. याबाबतची माहिती खैबर पख्तुनख्वा प्रांतातील पुरातत्त्व खात्यातील अधिकारी फजल खालिक यांनी दिली आहे. त्यांनी म्हटलंय की सापडलेलं मंदिर हे हिंदू संस्कृतीतील भगवान विष्णूचं आहे. 

फजल खालिक यांनी माहिती दिलीय की, हिंदू शाही काळातील हिंदूंनी 1300 वर्षांपूर्वी हे मंदिर बांधले होते. हिंदू शाही किंवा काबूल शाही एक हिंदू राजवंश होते. त्यांचं साम्राज्य पूर्व अफगानिस्तानातील काबुल खोऱ्यात, आधुनिक पाकिस्तान आणि अफगाणिस्तानातील गंधार आणि सध्याच्या वायव्य भारतावर होतं. या मंदिरासोबतच तज्ज्ञांना उत्खननादरम्यान मंदिराच्या जागेजवळ छावण्यांचे आणि पहारेकऱ्यांसाठी असलेल्या टेहळणी बुरुजांचे अवशेषही सापडले आहेत. तसेच एक पाण्याचा कुंडही सापडला आहे. पुरातत्त्व शास्त्रज्ञांनी असा अंदाज व्यक्त केलाय की हिंदू भाविक देवदर्शनापूर्वी स्नानासाठी या कुंडाचा वापर करत असावेत. 

हेही वाचा - आउट ऑफ टर्न प्रमोशन; दबंग कामगिरीनं कॉन्स्टेबल महिला बनली थेट इंस्पेक्टर
पाकिस्तानातील स्वात जिल्ह्यात अनेक पुरातन गोष्टी याआधीही सापडलेल्या आहेत. हजारो वर्षांपूर्वीच्या पुरातन वास्तूंचं ते घर आहे. पण या परिसरात हिंदू शाही काळातील अशा खुणा पहिल्यांदाच सापडलेल्या आहेत, अशी माहिती खलीक यांनी दिली आहे. स्वात जिल्ह्यात सापडलेल्या गांधार संस्कृतीतील हे मंदिर पहिलंच आहे, अशी माहिती इटालियन पुरातत्त्व मिशनचे प्रमुख डॉक्टर लुका यांनी दिली आहे. या स्वात जिल्ह्यात बौद्ध धर्माचीही अनेक प्रार्थनास्थळं सापडली आहेत. 


 

loading image