अमेरिकाः अलास्काच्या किनाऱ्याला 7.5 रिश्टर स्केलचा भूकंपाचा तीव्र धक्का, सुनामीचा इशारा

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 20 October 2020

समुद्र किनाऱ्यापासून नागरिकांनी दूर राहण्याची सूचना करण्यात आली आहे. त्याचबरोबर उंच भागात नागरिकांनी स्थलांतर करावे असेही सांगण्यात आले आहे. 

अलास्का- कोरोनामुळे त्रस्त असलेल्या अमेरिकेला आता सुनामीचा धोका आहे. अलास्काच्या किनाऱ्यावर सोमवारी 7.5 रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का जाणवला. त्यानंतर प्रशासनाने सुनामीचा इशारा जारी केला आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू शहरापासून 94 किमी दूर होता. 

नॅशनल ओशिएनिक अँड अ‍ॅटमॉस्फिरिक अ‍ॅडमिनिस्ट्रेशनने दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी 5 च्या सुमारास 7.4 तीव्रतेचे धक्के जाणवले. अलास्का भूकंप केंद्रानुसार, पहिल्या धक्क्यानंतर आणखी दोन तीव्र धक्के जाणवले. त्यांची तीव्रता 5 रिश्टर स्केलपेक्षा जास्त होती. 

हेही वाचा- एमएसपी दराने आठ राज्यात ८५ लाख टन तांदळाची खरेदी

अलास्का परिसरात राहणाऱ्या नागरिकांना संदेशाच्या माध्यमातून सुनामीचा इशारा पोहोचवण्यात आला आहे. नॅशनल वेदर सर्व्हिसेसनेही नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे. समुद्र किनाऱ्यापासून नागरिकांनी दूर राहण्याची सूचना करण्यात आली आहे. त्याचबरोबर उंच भागात नागरिकांनी स्थलांतर करावे असेही सांगण्यात आले आहे. 

हेही वाचा- निवडणुकीसाठी ‘होऊ द्या खर्च’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Earthquake in Alaska america tsunami warning