Afghanistan Earthquake : अफगानिस्तानमध्ये 4.7 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप

अफगाणिस्तानात पुन्हा एकदा जाणवले भूकंपाचे धक्के
 Earthquake
Earthquake esakal

अफगाणिस्तानात आज पुन्हा एकदा भूकंपाचे तीव्र धक्के जाणवलेत. या भूकंपाची तीव्रता 4.7 रिश्टर स्केलवर इतकी आहे. अफगाणिस्तानमधील फैजाबाद जिल्ह्यात आज सकाळी 7.06 वाजता हा भूकंप झाल्याची माहिती समोर आली आहे. याबाबतची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेना दिली आहे.

अफगाणिस्तानमध्ये फैजाबादपासून 285 किलोमीटर अंतरावर हे भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. या भूकंपाचा केंद्रबिंदू 107 किलोमीटर खोल असल्याची माहिती एएनआय वृत्तसंस्थेने दिली आहे.

अफगाणिस्तानमध्ये सात दिवसांत तिसऱ्यांदा हे भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. आज सकाळी भूकंपाचा धक्का बसला. याआधी 8 मार्च रोजी 4.2 रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. या भूकंपाचा केंद्रबिंदू 136 किमी खोलीवर होता. भूकंपाचे धक्के  जाणवत असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com