नेपाळ हादरले; शास्त्रज्ज्ञ म्हणताहेत ही मोठ्या भूकंपाची चाहूल

सकाळ ऑनलाईन टीम
Wednesday, 16 September 2020

नेपाळमधील काठमांडू खोऱ्यातील सिंधुपालचौक जिल्ह्यात भूकंपाचा केंद्रबिंदू होते. नेपाळमधील वृत्तपत्र एपोक टाइम्सच्या वृत्तानुसार, नेपाळमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचा मोठा भूकंप जाणवू शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

काठमांडू :  Earthquake In Nepal : नेपाळमध्ये बुधवारी पहाटेच्या दरम्यान भूकंपाचा जोरदार धक्का बसला. भूकंपाची तीव्रता 5.1  रिश्टर स्केल इतकी होती.  भूकंपाचे केंद्र हे काठमांडूपासून जवळपास 48 किमी अंतरावर होते. स्थानिक वृत्तानुसार पहाटे 5 वाजून 4 मिनिटांनी भूकंपाचा हा धक्का जाणवला. या भूकंपाची तीव्रता इचकी होती की बिहारमधील काही भागातही याचे धक्के जाणवले.  

बिहारच्या विकासात भाजपही वाटेकरी; नितीश यांना श्रेय न जाऊ देण्याची खबरदारी

नेपाळमधील काठमांडू खोऱ्यातील सिंधुपालचौक जिल्ह्यात भूकंपाचा केंद्रबिंदू होते. नेपाळमधील वृत्तपत्र एपोक टाइम्सच्या वृत्तानुसार, नेपाळमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचा मोठा भूकंप जाणवू शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. यूनिवर्सिटी ऑफ अल्बर्टाच्या शास्त्रज्ञांनी जमीनीतून येणाऱ्या आवाजाच्या अंदाजावरुन नेपाळमध्ये मोठ्या भूकंपाची शक्यता असल्याचा अंदाज बांधला आहे.  2015 मध्ये नेपाळने प्रलयकारी भूकंप अनुभवला होता. राजधानी काठमांडूच्या पोखरा येथे केंद्रबिंदू असलेल्या ठिकाणी  7.9 तीव्रतेच्या भूकंप झाला होता. यात जवळपास 9000 लोकांनी आपला जीव गमावला होता.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Earthquake With Magnitude 5.3 Strikes Near Kathmandu Nepal

Tags
टॉपिकस
Topic Tags: