Indonesia Earthquake: तीव्र भूकंपामुळे इंडोनेशिया हादरलं, रिश्टर स्केलवर 6.7 तीव्रता

नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (एनसीएस) नुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू पृथ्वीच्या खाली 80 किमी खोलीवर होता. भारतीय वेळेनुसार रात्री 2.18 च्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले.
Earthquake of Magnitude 6 7 on the Richter Scale strikes Talaud Islands Indonesia marathi news
Earthquake of Magnitude 6 7 on the Richter Scale strikes Talaud Islands Indonesia marathi news

इंडोनेशियाच्या तलाउड बेटांवर मंगळवारी (9 जानेवारी) 6.7 तीव्रतेचा भूकंपाचे धक्के बसले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (एनसीएस) नुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू पृथ्वीच्या खाली 80 किमी खोलीवर होता. भारतीय वेळेनुसार रात्री 2.18 च्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले.

नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (एनसीएस) ने सोशल मीडिया साइट एक्स वर पोस्ट करत याबद्दलची माहिती दिली आहे. या भूकंपाचा केंद्रबिंदू पृथ्वीपासून 80 किमी खाली होता. भूकंपाचे हे धक्के इंडोनेशियातील तलाउड बेटावर जाणवले. युनायटेड स्टेट्स जिऑलॉजिकल सर्व्हे (USGS) ने सांगितले की, गेल्या आठवड्यात गुरुवारी इंडोनेशियातील बलाई पुंगुट येथे भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले.

Earthquake of Magnitude 6 7 on the Richter Scale strikes Talaud Islands Indonesia marathi news
Sharad Mohol Murder : पुण्यात गँगवॉर भडकणार? मोहोळवर गोळीबार करताना आरोपीकडून कुख्यात गुंडाच्या नावाने घोषणाबाजी

इंडोनेशियामध्ये 6.7 तीव्रतेचा भूकंप होऊनही, अद्याप कोणतीही जीवित किंवा मालमत्तेची हानी झाल्याचे वृत्त नाही. इंडोनेशियामध्ये सतत भूकंपाचे धक्के जाणवतात, त्यामागील मुख्य कारण म्हणजे या ठिकाणची भौगोलिक रचना आहे. इंडोनेशिया हे पॅसिफिक महासागराच्या रिंग ऑफ फायरवर वसलेले आहे, त्यामुळे तेथे सतत भूकंप होत असतात. रिंग ऑफ फायर पॅसिफिक, कोकोस, भारतीय-ऑस्ट्रेलियन, जुआन डी फुका, नाझका, उत्तर अमेरिकन आणि फिलीपीन टेक्टोनिक प्लेट्सशी जोडलेलाी आहे

Earthquake of Magnitude 6 7 on the Richter Scale strikes Talaud Islands Indonesia marathi news
Bilkis Bano Case: 2002 सालच्या दंगलीत गर्भवती बिल्किस बानोवर अत्याचार, कुटुंबियांची हत्या; मग आरोपी सुटले तरी कसे? वाचा सविस्तर

जपानमध्ये एक जानेवारी रोजी मोठ्या प्रमाणात भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले होते. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 7.6 इतकी मोजली गेली होती. या भूकंपामुळे तेथे सुनामीचा इशाराही देण्यात आला होता. जपानमधील भूकंपामुळे आतापर्यंत 100 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com