esakal | ज्वालामुखीच्या स्फोटानंतर हवाईला भूकंपाचे धक्के
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

ज्वालामुखीच्या स्फोटानंतर हवाईला भूकंपाचे धक्के

sakal_logo
By
वृत्तसंस्था

सॅन फ्रान्सिस्को: किलाऊ ज्वालामुखीचा स्फोट झाल्यानंतर त्याच्या दुसऱ्याच दिवशी हवाई प्रांतातील बेटांना आज भूकंपाचा जोरदार धक्का बसला. या भूकंपाच्या धक्‍क्‍यांनतर किलाऊ ज्वालामुखीमध्ये आणखी स्फोट झाले असल्याचे सांगण्यात आले.

आज बसलेल्या एका भूकंपाच्या धक्‍क्‍याची तीव्रता 6.9 रिश्‍टर स्केल होती. किलाऊ ज्वालामुखीपासून अग्नेय दिशेला या भूकंपाचा केंद्रबिंदू होता. 1975नंतर हवाईतील बेटांना बसलेला भूकंपाचा सर्वांत मोठा धक्का आहे.

भूकंपाचे धक्के बसल्यानंतर अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला. अनेक नागरिकांनी रस्त्यावर धाव घेतली. मात्र, सुनामीचा इशारा देण्यात आलेला नाही. भूकंपाच्या धक्‍क्‍यानंतर किलाऊ ज्वालामुखीचे नव्याने स्फोट झाल्याचे सांगण्यात आले.

ज्वालामुखीतून तप्त शिलारस सुमारे शंभर फूट वर फेकला जात होता. त्यामुळे अनेक घरांचे नुकसान झाले असून, रस्त्यांवर मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत. या भागातून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात येत आहे. ज्वालामुखीच्या जवळच्या भागात विषारी वायू पसरला असून, त्यामुळे बचाव पथकाला काम करणे अवघड बनले आहे. ज्वालामुखीचे आणखी स्फोट होण्याची शक्‍यता अमेरिकेच्या भूगर्भशास्त्र विभागाने वर्तविली आहे.

loading image