Egypt Church Fire : इजिप्तमध्ये चर्चला भीषण आग, ४१ जणांचा मृत्यू

egypt church fire 41 killed in fire in cairo church in egypt
egypt church fire 41 killed in fire in cairo church in egypt

Egypt Church Fire : इजिप्त मध्ये चर्चला भीषण आग लागल्याने चेंगराचेंगरी झाली. या अपघातात 41 जणांचा मृत्यू झाला आहे. इजिप्तमधील कॉप्टिक चर्च (Coptic Church) ने दिलेल्या माहितीनुसार, कैरो येथील चर्चला आग लागल्याने किमान 41 लोक ठार आणि 14 जखमी झाले आहेत.

दरम्यान या आगीचे कारण लगेच कळू शकले नाही. प्राथमिक तपासात इलेक्ट्रिकल शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. निवेदनात म्हटले आहे की, रविवारी सकाळी बैठक सुरू असताना आग लागली. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या 15 गाड्या घटनास्थळी रवाना करण्यात आल्या असून जखमींना रुग्णवाहिकांमधून जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आल्याचे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

egypt church fire 41 killed in fire in cairo church in egypt
Vinayak Mete : मेटे ज्या कारमधून प्रवास करत होते, ती किती सुरक्षित? जाणून घ्या

राष्ट्रपती कार्यालयाने सांगितले की, अध्यक्ष अब्देल फताह अल-सिसी यांनी कॉप्टिक ख्रिश्चन पोप तावाड्रोस II यांच्याशी फोनवर बोलून शोक व्यक्त केला. अल-सिसी यांनी फेसबुकवर केलेल्या पोस्टमध्ये मी या दुःखद अपघाताच्या घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. मी सर्व संबंधित राज्य संस्था आणि संस्थांना सर्व आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत आणि हा अपघात आणि त्याचे परिणाम त्वरित हाताळावेत असे निर्देश दिले आहेत.

इजिप्तमध्ये अलिकडच्या वर्षांत अनेक मोठ्या आगीच्या दुर्घटना घडल्या आहेत. मार्च 2021 मध्ये, कैरोच्या पूर्व उपनगरातील एका कपड्याच्या कारखान्याला लागलेल्या आगीत किमान 20 लोकांचा मृत्यू झाला होता. 2020 मध्ये, दोन रुग्णलयात लागलेल्या आगीत 14 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला.

egypt church fire 41 killed in fire in cairo church in egypt
Smartphone Launch : या आठवड्यात लॉन्च होणार हे स्मार्टफोन, पाहा यादी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com