Smartphone Launch : या आठवड्यात लॉन्च होणार हे स्मार्टफोन, पाहा यादी

smartphones are going to be launched this week check details here
smartphones are going to be launched this week check details here

ऑगस्ट महिन्याचा अर्धा महिना संपत आला असून आतापर्यंत अनेक स्मार्टफोन लॉन्च झाले आहेत. पण ऑगस्टच्या उरलेल्या महिन्यात देखील अनेक नवीन स्मार्टफोन्स लाँच व्हायचे आहेत. आज आपण या आठवड्यात लॉन्च होणाऱ्या स्मार्टफोनबद्दल जाणून घेणार आहोत. Vivo आणि Realme चे स्मार्टफोन या आठवड्यात लॉन्च होणार आहेत.

हे स्मार्टफोन याच आठवड्यात लाँच होणार आहेत

Vivo V25 Pro

चीनी कंपनी 17 ऑगस्टला Vivo V25 Pro नावाने एक नवीन स्मार्टफोन भारतात लॉन्च करणार आहे. या फोनचे सर्वात खास वैशिष्ट्य म्हणजे कंपनीने यामध्ये चेंजिंग फ्लोराइट एजी ग्लास नावाने एक फीचर दिले आहे, जे त्याच्या बॅक पॅनलचा रंग बदलते. या फोनला 120 HZ चा रिफ्रेश रेट मिळेल. या फोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप उपलब्ध असेल. कंपनीने यामध्ये 64 MP OIS बॅक कॅमेरा दिला आहे. यात 4,830 mAh ची बॅटरी मिळेल. यासोबतच यामध्ये 66 W चे फास्ट चार्जिंगचे फीचर देखील देण्यात आले आहे. विवो या फोनला Magical फोन असे म्हणत आहे.

smartphones are going to be launched this week check details here
Moto Tab G62 : भारतात 17 ऑगस्टला होणार लॉन्च, लॉन्चपूर्वीच वाचा फीचर्स

Realme 9i 5G

Realme 18 ऑगस्ट रोजी भारतात आपला नवीन स्मार्टफोन Realme 9i 5G लॉन्च करेल. या फोनमध्ये Mediatek Dimensity 810 प्रोसेसर उपलब्ध असेल. या फोनमध्ये लेझर लाइट डिझाइन उपलब्ध असेल. हा फोन ट्रिपल कॅमेरा सेटअप सह सादर केला जाईल. हा फोन फक्त 5G नेटवर्कसह लॉन्च केला जाईल. Realme या फोनला Rockstar फोन म्हणत आहे.

smartphones are going to be launched this week check details here
Jio Phone 5G : लवकरच लॉंच होऊ शकतो जिओचा 5G फोन, जाणून घ्या किंमत

Motorola Moto Tab G62

Motorola 17 ऑगस्ट रोजी भारतात आपला Moto Tab G62 लॉन्च करणार आहे. या टॅबमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 680 ऑक्टा कोर प्रोसेसर बसवण्यात आला आहे. या टॅबलेटला 7,700 mAh ची बॅटरी मिळेल. यासोबतच 20W फास्ट चार्जिंग फीचर देखील उपलब्ध असेल. डिस्प्लेबद्दल बोलायचे झाले तर, या टॅबला 10.6-इंच स्क्रीनचा IPS LCD डिस्प्ले मिळेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com