esakal | स्वीडनमध्ये दहशतवादी हल्ला? हल्लेखोराने 8 जणांना भोसकले
sakal

बोलून बातमी शोधा

sweden

यूरोपीय देश स्वीडनमध्ये चाकू हल्ल्याची घटना समोर आली आहे. एका हल्लेखोराने चाकू मारुन आठ लोकांना जखमी केलं आहे.

स्वीडनमध्ये दहशतवादी हल्ला? हल्लेखोराने 8 जणांना भोसकले

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

स्टॉकहोम- यूरोपीय देश स्वीडनमध्ये चाकू हल्ल्याची घटना समोर आली आहे. एका हल्लेखोराने चाकू मारुन आठ लोकांना जखमी केलं आहे. पोलिस याला दहशतवादी हल्ला मानत आहेत. हल्लेखोराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याआधी पोलिसांनी त्याला गोळी मारली होती. त्यामुळे तो जखमी झाला होता. पंतप्रधान स्टीफॅन लोफवेन यांनी या घटनेला 'भयावह हिंसा' असं म्हटलं आहे. ही घटना स्वीडनचे दक्षिणेकडील शहर वॅटलँडामधील स्थानिक वेळेनुसार दुपारी 3 वाजता घडली. हल्लेखोराचं वय 20 वर्ष असल्याचं सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर पोलिसांनी परिसराला घेरले आहे. हल्लेखोराने वेगवेगळ्या पाच ठिकाणी चाकू हल्ला केला. ज्यात 8 लोक जखमी झाल्याची माहिती आहे. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. 

संबंधित घटनेचा दहशतवादी हल्ला म्हणून तपास

सुरुवातीला पोलिसांनी या घटनेला हत्येच्या स्वरुपात पाहिलं होतं, पण त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास दहशतवादी हल्ला म्हणून सुरु केली आहे. अधिकाऱ्यांनुसार, हल्लेखोर याच भागाचा रहिवाशी आहे, जेथे त्याने हल्ला केला. विशेष म्हणजे छोट्या-मोठ्या अन्य गुन्ह्यामध्येही त्याचे नाव आले आहे. या व्यक्तीबद्दल पोलिसांकडे आधीपासूनचा काही माहिती उपलब्ध आहे. 

स्वत:च्या मुलीचे शिर घेऊन पोलिस ठाण्यात गेला; शांतपणे म्हणाला, 'बॉडी घरी...

विशेष म्हणजे गेल्या 10 वर्षांपासून स्वीडनमध्ये हल्ल्याच्या घटना वाढल्या आहेत. गेल्या काही वर्षातील घटनांकडे पाहिले तर डिसेंबर 2010 मध्ये इराकी दहशतवाद्याने स्टॉकहोमच्या सिटी सेंटरवर एक आत्मघाती हल्ला केला होता. एप्रिल 2017 मध्ये एका उझबेकिस्तान शरणार्थीने लॉरीचा वापर करुन रस्त्यावरील पाच लोकांना चिरडले होते. तो व्यक्ती इस्लामिट स्टेटशी सहानुभूती ठेवणारा होता. 

loading image
go to top