El Niño Winter 2026 : एल निनोचा हिमालयाला मोठा तडाखा बसण्याची शक्यता; भारत, नेपाळ, पाकिस्तानसह अफगाणिस्तानलला अतिवृष्टी, हिमस्खलनाचा धोका

Flood Risk : अफगाणिस्तान, पाकिस्तान, उत्तर भारत आणि नेपाळमध्ये जास्त हिमसाठा होण्याची शक्यता असताना भूतान व पूर्व झिझांगमध्ये बर्फवृष्टी कमी राहू शकते. १९५० नंतरच्या सर्वात तीव्र एल निनोंपैकी एक होण्याची शक्यता सुमारे ६० टक्के आहे
El Niño Winter Outlook 2026 for Hindu Kush Himalaya

El Niño Winter Outlook 2026 for Hindu Kush Himalaya

esakal

Updated on: 

भारतासह दक्षिण आशियातील अनेक देशांसाठी आगामी हिवाळा आव्हानात्मक ठरण्याची शक्यता आहे. सध्या सक्रिय होत असलेल्या शक्तिशाली 'एल निनो' (El Niño) हवामान घटनेमुळे हिमालयीन प्रदेशात सरासरीपेक्षा अधिक पाऊस आणि बर्फवृष्टी होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यामुळे नेपाळ, भारत, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील काही भागांना नैसर्गिक आपत्तींचा सामना करावा लागू शकतो. अतिवृष्टी, पूर, भूस्खलन आणि हिमस्खलनाचा धोका वाढण्याची शक्यता असून, काही भागांत दुष्काळ आणि जंगलातील वणव्याचे संकटही निर्माण होऊ शकते.

सकाळ, साम, सरकारनामा, अ‍ॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा

Loading content, please wait...