Twitter: इलॉन मस्क यांच्यावर अमेरिकेची वक्रदृष्टी; आता ट्विटर डीलची चौकशी करण्याचे सुतोवाच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Elon musk and joe biden

Twitter: इलॉन मस्क यांच्यावर अमेरिकेची वक्रदृष्टी; आता ट्विटर डीलची चौकशी करण्याचे सुतोवाच

नवी दिल्ली - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी बुधवारी सांगितले की, इलॉन एलन मस्क यांचे इतर देशांशी असलेल्या संबंधांची चौकशी करणे आवश्यक आहे. इलॉन मस्क यांनी ट्विटर विकत घेतल्यानंतर या डीलमधील सौदीच्या भागीदारीबाबत विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर देताना जो बायडन यांनी हे विधान केलं आहे. या प्रश्नाचं उत्तर देताना बायडेन काही वेळ थांबले होते.

हेही वाचा: King Charles III : "तू आमचा राजा नाहीस"; घोषणा देत ब्रिटनच्या राजाला फेकून मारली अंडी

बायडेन पुढं म्हणाले की, मस्क काही चुकीचं करत असं मी म्हणत नाही. पण एवढंच सांगेन की त्यांचा व्यवहार चौकशी करण्याजोगा आहे. इलॉन मस्क यांच्या ४४ अब्ज डॉलर्सच्या ट्विटर टेकओव्हर कराराची राष्ट्रीय सुरक्षा एजन्सीकडून चौकशी करण्याचा विचार बायडेन प्रशासन करत आहे. त्याचं कारण म्हणजे, गुंतवणूकदारांचा एक विशिष्ट गट या खरेदीमागे आहे. गुंतवणूकदारांच्या या गटांत सौदी अरेबियाचे प्रिन्स अल्वलीद बिन तलाल आणि कतारच्या सॉवरेन वेल्थ फंड यांचा समावेश आहे.

हेही वाचा: काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत शरद पवार सहभागी होणार? काँग्रेस प्रवक्ते रमेश म्हणाले...

आगामी काळात मानवधिकार कार्यकर्ते आणि सौदी सरकारच्या विरोधकांविरोधात ट्विटर युजर्सचा डेटा वापरला जावू शकतो. हे रोखण्यासाठी अमेरिकेच्या दोन खासदारांनी ट्विटर कराराची चौकशी करण्याची मागणी केली होती.

"सौदी अरेबिया आता सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा भागधारक आहे, याची सर्वांना काळजी वाटली पाहिजे. राजकीय आवाज दडपण्यात आणि अमेरिकन राजकारणावर प्रभाव पाडण्यात सौदीला अधिक रस आहे," असे कॅनिकटमधील कॉंग्रेसचे सदस्य ख्रिस मर्फी यांनी म्हटलं.

हेही वाचा: Sanjay Raut: राऊतांच्या 'त्या' पुस्तकांमध्ये नेमकं काय? जेलमध्ये लिहिली दोन पुस्तकं

रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर इलॉन व्लादिमीर पुतीन यांच्याकडे झुकल्याचा आरोप झाला होता. एवढेच नव्हे तर, तैवान हे बेट चीनचा भाग असायला हवं, असेही इलॉन मस्क यांनी म्हटले होतं. त्यांच्या या विधानाचे चिनी अधिकाऱ्यांनी स्वागत केले होते. तर तैवानचे अधिकारी या विधानावर संतापले होते.

एलन मस्क यांच्या टेस्ला इलेक्ट्रिक ऑटो कंपनीने चीनमधील शांघायमध्ये विक्रमी पातळीवर उत्पादन सुरू केले आहे.