
Twitter CEO: करार संपल्याशिवाय पराग अग्रवाल यांची बदली होणार नाही
जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती आणि टेस्लाचे मालक एलॉन मस्क यांनी ट्वीटर कंपनी विकत घेतली आणि जगभरातील उद्योग समूहात आश्चर्याचा धक्का बसला. त्यांना त्याआधी ट्वीटर विकत घेण्यासाठी ऑफर दिली होती त्यानंतर ट्वीटरमध्ये गुंतवणूक केलेल्या काही उद्योजकांनी यासाठी विरोध केला होता. त्यांनी काही दिवसांत कंपनी ४४ बिलीयन डॉलरमध्ये विकत घेतली.
हेही वाचा: केजरीवालांना मारण्याची धमकी देणाऱ्या भाजप नेत्याला घरात घुसून अटक
एलॉन मस्क यांनी ट्वीटर कंपनी विकत घेतल्यावर ट्वीटरचे भारतीय वंशांचे सीईओ पराग अग्रवाल यांना ट्वीटरमधून काढून टाकणार का अशा चर्चा सुरू होत्या पण त्यांचा ४४ बिलियन डॉलरचा करार संपल्याशिवाय ते पराग अग्रवाल यांना काढून टाकणार नसल्याची माहिती सीएनबीसीच्या डेव्हिड फॅबरने शेअर केली आहे. त्यामुळे आता पराग अग्रावाल हे ट्वीटरचे CEO असणार आहेत.
गेल्या वर्षी Jack Dorsey ही कंपनी सोडल्यावर सहा महिन्यापूर्वी ते ट्वीटरचे नवे CEO बनले होते. त्यानंतर टाउनहॉलच्या बैठकीत पराग अग्रवाल म्हणाले होते की, मस्क यांच्या नेतृत्वाखाली कंपनीचे भविष्य अनिश्चित आहे. त्यानंतर त्यांना ट्वीटरमधून काढणार असल्याच्या चर्चा माध्यमात पसरल्या होत्या, पण CNBC ने दिलेल्या वृत्तानुसार ४४ बिलियन डॉलरचा करार संपेपर्यंत पराग अग्रवाल यांची बदली किंवा नियुक्ती करण्यात येणार नसल्याचं स्पष्ट झालंय.
हेही वाचा: मुलींना छेडताना अटक केलेल्या व्यक्तीचा मोबाईल पाहून पोलिसही हैराण
तसेच ट्वीटरचे माजी CEO जॅक डोर्सी यांचाही पुढच्या सीईओ पदासाठी विचार केला जाऊ शकतो. कंपनीचा फायदा आणि उत्पन्न वाढवण्यासाठी मस्क हे कंपनीतील कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची माहिती असून त्याआधी त्यांनी ट्वीटरमध्ये गुंतवणूक करणाऱ्या बॅंकांना अशी माहिती दिली होती. दरम्यान त्यांच्या या भूमिकेवरुन कर्मचाऱ्यांना आपल्या नोकऱ्याबद्दल भीती निर्माण झाली आहे.
पराग अग्रवाल हे म्हणाले होते की, "मला माझ्या नोकरीद्दल नाही तर माझ्या कंपनीच्या भविष्याबद्दल आणि तिच्या प्रगतीबद्दल जास्त काळजी आहे." दरम्यान जर मस्क यांनी पराग अग्रवाल यांनी १२ महिन्याच्या आत काढून टाकण्याचा प्रयत्न केला तर पराग अग्रवाल यांना ४ कोटी ३० लाख रुपये द्यावे लागणार आहेत.
Web Title: Elon Musk Twitter Ceo Parag Agrawal Changes
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..