
एकेकाळी डोनाल्ड ट्रम्प यांचे जवळचे सहकारी आणि सल्लागार असलेले अब्जाधीश इलॉन मस्क यांनी पुन्हा एकदा अमेरिकेच राष्ट्राध्य डोनाल्ड ट्रम्प यांच्या "वन बिग, ब्युटीफुल बिल" वर जोरदार टीका केली आहे. मस्क यांनी ट्रम्प यांच्या बहुचर्चित विधेयकाचे वर्णन वेडपटपणा आणि सामान्य करदात्यांवर ओझे असल्याचे म्हटले आहे. यासोबतच, त्यांनी इशारा दिला आहे की जर सिनेटने हे विधेयक मंजूर केले तर ते दुसऱ्या दिवशी "अमेरिका पार्टी" नावाचा एक नवीन राजकीय पक्ष सुरू करतील.