Elon Musk Donation : इस्राइल आणि गाझाच्या रुग्णालयांमध्ये 'एक्स' पोहोचवणार मदत; इलॉन मस्कचा मोठा निर्णय!

Israel Hamas War Update : दोन्ही ठिकाणच्या रुग्णालयांसोबतच गाझामध्ये काम करत असणाऱ्या रेड क्रॉस संघटनेला देखील मस्क मदत पोहोचवणार आहे.
Elon Musk Gaza Help
Elon Musk Gaza HelpeSakal

Israel-Hamas War : इस्राइल-हमास युद्ध चार दिवसांसाठी थांबणार असल्याचं वृत्त आता समोर येत आहे. मात्र यापूर्वीच इलॉन मस्कने एक मोठी घोषणा केली आहे. गाझा आणि इस्राइलमधील रुग्णालयांना मस्क मदत पाठवणार आहे. या युद्धाबाबत आलेल्या पोस्ट, त्यातील जाहिराती आणि सबस्क्रिप्शन यातून जो नफा 'एक्स'ला (ट्विटर) झाला आहे; तो सर्व नफा यासाठी वापरण्यात येणार असल्याचं मस्कने घोषित केलं.

इलॉन मस्कने एक्स पोस्ट करत याबाबत माहिती दिली. दोन्ही ठिकाणच्या रुग्णालयांसोबतच गाझामध्ये काम करत असणाऱ्या रेड क्रॉस संघटनेला देखील मस्क मदत पोहोचवणार आहे. हे पैसे कसे खर्च होतील याकडे देखील आपण लक्ष देणार आहोत, जेणेकरून ही मदत हमासच्या दहशतवाद्यांकडे पोहोचणार नाही, असंही मस्कने यावेळी स्पष्ट केलं.

इलॉन मस्कने यापूर्वी देखील युद्धामध्ये मदत करण्याचा निर्णय घेतला होता. गाझा पट्टीमधील इंटरनेट सेवा बंद केल्यानंतर, तिथे मदत करणाऱ्या संस्थांना अडचण येत होती. त्यामुळे गाझामधील ठराविक स्वयंसेवी संस्थांना आणि पत्रकारांना इलॉन मस्कने स्टारलिंकचं सॅटेलाईट इंटरनेट उपलब्ध करून दिलं होतं. (Global News)

Elon Musk Gaza Help
Israel-Hamas Ceasefire : चार दिवसांसाठी थांबणार इस्राइल-हमास युद्ध; 50 ओलिसांच्या सुटकेसाठी शस्त्रसंधीचा करार - रिपोर्ट

हमास-इस्राइल शस्त्रसंधी

दरम्यान, एक महिन्यापेक्षा अधिक काळापासून सुरू असलेलं इस्राइल-हमास युद्ध आता काही काळासाठी थांबणार आहे. 50 ओलिस नागरिकांच्या सुटकेच्या बदल्यात चार दिवसांची शस्त्रसंधी करण्यास इस्राइलने मंजूरी दिली आहे. तसंच, प्रत्येकी दहा नागरिकांच्या सुटकेच्या बदल्यात शस्त्रसंधी आणखी एक-एका दिवसांनी वाढवण्याची तयारी देखील इस्राइलने दाखवली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com