कोरोना संसर्गाचा केंद्रबिंदू चीनकडून आता या देशाकडे; वाचा सविस्तर

Coronavirus
Coronavirus

लिमा (पेरु) - कोरोना संसर्गाचा केंद्रबिंदू आता चीनकडून दक्षिण अमेरिकेकडे सरकल्याचे बोलले जात आहे. दक्षिण अमेरिकेतील नागरिक रोजगार गमावल्यामुळे रस्त्यावर आले असून ते गावाकडे जाण्यासाठी तासनतास रस्त्यावर ताटकळत उभे राहत असल्याचे चित्र आहे.

जगभरातील इतर बातम्यांसाठी येथे क्लिक करा 

यादरम्यान त्यांच्या प्रवासात काही मुलांचा दुर्देवी मृत्यू देखील होत असल्याचे ॲक्शन अगेंस्ट हंगर संघटनेने म्हटले आहे. स्थलांतरीत मजुरांचे अपघात देखील होत असल्याचे त्यांनी नमूद केले. कोरोना संसर्गामुळे लॅटिन अमेरिकेतील सुमारे २ कोटी ९० लाख नागरिक गरीबीत ढकलले गेल्याचा अंदाज वर्तविला आहे. यादरम्यान जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले की, दक्षिण अमेरिका हा कोरोनाचे नवे केंद्रबिंदू ठरत आहे. जगभरात आतापर्यंत ५२ लाखांहून नागरिकांना बाधा झाली असून ३ लाख ३७ हजार जणांचा मृत्यू झाला आहे.

कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पेरु देशाने लॉकडाउनचा कालावधी जूनखेरपर्यंत वाढविला आहे. लॉकडाउनला मुदतवाढ देण्याची ही पाचवी वेळ आहे. पहिला लॉकडाउन मध्य-मार्च महिन्यात लागू करण्यात आला होता. मात्र कोरोना आटोक्यात येत नसल्याने ३ कोटी २० लाख लोकसंख्येच्या देशात पेरु सरकारने लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय घेतला.

३० जूनखेरपर्यंत लॉकडाउन लागू राहिल्यास पेरु देशातील नागरिक हे तीन किंवा साडेतीन महिन्यांपेक्षा अधिक काळ घरात बंद राहतील. पेरूची राजधानी लिमा येथे अध्यक्ष मार्टिन वित्झकारा यांना दूरचित्रवाणीवरून लॉकडाउन वाढवण्याची घोषणा केली. पेरूत १ लाखाहून अधिक नागरिकांना कोरोनाची बाधा झाली आहे. पाचव्या लॉकडाउनमध्ये काही सेक्टरमध्ये शिथिलता दिली जाणार आहे. त्यात घरगुती साहित्याचे दुकान,सलून आणि दंतवैद्यकीय सेवा सुरू केली जाणार आहे. काही खेळांवरचे निर्बंधही काढण्यात आले आहेत. त्यात व्यावसायिक फूटबॉलचा समावेश आहे.

स्टेडियमध्ये प्रेक्षकांशिवाय सामने खेळवण्यात येणार आहेत. कोरोनाबाधित लोकांची संख्या पाहिल्यास पेरू हा लॅटिन अमेरिकेत दुसऱ्या क्रमांकावर आहे. आतापर्यंत बाधितांची संख्या १११,६९८ एवढी झाली असून मृतांची संख्या ३२४४ वर पोचली आहे. 

लॉकडाउन कशामुळे अपयशी
पेरुत मार्च महिन्यापासून लॉकडाउन असले तरी संख्या वाढीमागे विलिगीकरणाचे निकष योग्य रितीने पाळले जात नसल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. ॲक्शन अगेंस्ट हंगर या संघटनेच्या मते, लॉकडाउनच्या काळात गरीब आणि श्रमिकांना अन्नांची भ्रांत झाल्याने त्यांच्या हालचालींवर निर्बंध आणणे कठिण जात आहे. संघटनेच्या मते, सुमारे १ लाख ६५ हजार नागरिकांनी नोकरी गमावली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com