

Shocking Details Emerge From Millions of Epstein Documents
Esakal
एपस्टिन फाइल्स प्रकाशित झाल्यानंतर जगभरात खळबळ उडालीय. अमेरिकेच्या न्याय विभागाने नुकतंच एपस्टिन फाइल्स ट्रान्सपरन्सी अॅक्ट अंतर्गत ३५ लाखांपेक्षा जास्त कागदपत्रे, ईमेल, पोलीस रिपोर्ट, फोटो आणि व्हिडीओ जारी केलेत. यात जेफ्री एपस्टिन आणि गिसलेन मॅक्सवेल यांच्याकडून चालवल्या जाणाऱ्या लैंगिक शोषणाच्या रॅकेटबाबत धक्कादायक गोष्टींचा खुलासा झाला आहे. या फाइल्समुळे फक्त अमेरिकाच नाही तर युरोप आणि इतर देशातील अनेक बड्या लोकांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.