social media ban under 13
esakal
EU Kids Act 2026 : युरोपियन युनियनने (EU) अल्पवयीन आणि किशोरवयीन मुलांच्या मानसिक आरोग्य व ऑनलाइन सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलले (EU Kids Act) आहे. १३ वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया वापरण्यास बंदी घालण्यासह किशोरवयीन मुलांसाठीही सोशल मीडिया वापरावर विविध निर्बंध लागू करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयन यांनी यासंदर्भातील घोषणा केलीये.