esakal | युरोपात हाहाकार! महापुरामुळे ११५ बळी; हजाराहून अधिक बेपत्ता
sakal

बोलून बातमी शोधा

युरोपात हाहाकार! महापुरामुळे 120 बळी; हजाराहून अधिक बेपत्ता

युरोपात हाहाकार! महापुरामुळे 120 बळी; हजाराहून अधिक बेपत्ता

sakal_logo
By
विनायक होगाडे

बर्लिन : पश्‍चिम जर्मनी आणि बेल्जियममध्ये आलेल्या महापुरामुळे मृतांची संख्या वर 120 पोचली आहे. याशिवाय 1300 हून अधिक नागरिक बेपत्ता असून त्यांचा शोध घेतला जात आहे. पूरामुळे शहरातील सर्व रस्ते पाण्याखाली गेले आहेत. अनेक गाड्या वाहून गेल्या असून इमारतींची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. पश्‍चिम युरोपात गेल्या काही दिवसांपूर्वी आलेल्या चक्रीवादळ आणि मुसळधार पावसाने नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आणि नदीकाठच्या शहरात शिरले.

हेही वाचा: रशियाचं विमान सायेबरियात बेपत्ता; 13 प्रवाशांचा जीव धोक्यात

राईनलँड-पॅलेटनेट प्रांतात ६० जणांचा मृत्यू झाला असून त्यात दिव्यांग व्यक्तीसाठी असलेल्या इमारतीत राहणाऱ्या नऊ जणांचा समावेश आहे. या शेजारील राज्य नॉथ राइन-वेस्टफालियातील मृतांची संख्या ४३ वर पोचली आहे. यात आणखी भर पडण्याची शक्यता आहे. कोलोग्नेच्या नेऋत्य भागातील इरफस्टाट येथे घरात अडकलेल्या नागरिकांची सुटका करण्याचे प्रयत्न केले जात आहे. घरांची पडझड झाल्याने त्याखाली दबून अनेकांचा मृत्यू झाला आहे. जर्मनीतील एहरेव्हिलर कौंटीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एफेल भागातील शुल्ड गावात काल रात्री अनेक घरे पडली आणि त्यात नागरिकांचा मृत्यू झाला आहे. सुमारे ५० हून अधिक नागरिक बेपत्ता असल्याचे म्हटले आहे. फोन आणि इंटरनेट विस्कळित झाल्याने मदत कार्यात अडथळे येत आहेत. अनेक नागरिक गच्चीवर उभे असून ते मदतीसाठी वाट पाहत आहेत. नौका आणि हेलिकॉप्टरच्या मदतीने नागरिकांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात येत आहे. मदतकार्यासाठी २०० हून अधिक सैनिकांना पाचारण करण्यात आले आहे. हजाराहून अधिक बेपत्ता नागरिकांचा शोध लावण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली जात आहे.

हेही वाचा: कोरोना विधवांच्या पुनर्वसनासाठी पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांना १४०० इमेल्स

बेल्जियममध्ये १० जणांचा मृत्यू

बेल्जियममध्ये मृतांची संख्या १० वर पोचली असून पाच जण अद्याप बेपत्ता आहेत. मुसळधार पावसामुळे काल बेल्जियममध्ये पूर आला असून अनेक गाड्या वाहून गेल्या आहेत. वेर्विस येथे चौघांचा मृत्यू झाला असून दक्षिण आणि पूर्व भागातील रस्ते जलमय झाले आहेत. रेल्वे वाहतूक ठप्प पडली आहे.

loading image