इम्रान खान यांच्यावर प्रचंड दबाव; 31 जानेवारीपर्यंत देणार राजीनामा?

सकाळ न्यूज नेटवर्क
Tuesday, 19 January 2021

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर 31 जानेवारीपर्यंत राजीनामा देण्याचा दबाव वाढला आहे.

इस्लामाबाद- पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर 31 जानेवारीपर्यंत राजीनामा देण्याचा दबाव वाढला आहे. 11 विरोधी पक्षांच्या पाकिस्तान डेमोक्रॅटिक मूव्हमेंटने यासाठी आपली सर्व शक्ती लावली आहे. वृत्तसंस्था एएनआयच्या माहितीनुसार, पाकिस्तानची विरोधी आघाडी 19 जानेवारीला निवडणूक आयोगासमोर निदर्शने करण्याची योजना बनवत आहे. याच दिवशी मरयम नवाज रावलपिंडीमध्ये एक मोठी रॅली घेणार आहेत. 

यंदाचा प्रजासत्ताक दिन खास; 'राफेल जेट' परेडमध्ये पहिल्यांदा दाखवणार...

पीएमएल-एन  (पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज) उपाध्यक्ष मरयम नवाज यांनी म्हटलं की, इम्रान सरकार माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांना भ्रष्टाचाराच्या आरोपात अडकवू पाहात आहे. आता इम्रान खान स्वत: ब्रॉडशीट प्रकरणात अडकले आहेत. पंतप्रधान स्वत:च्या बनवलेल्या जाळ्यात अडकले आहेत. लाहोरमध्ये एका सभेला संबोधित करताना ते म्हणाले की, नवाज शरीफ याच्यांवरील कोणतेही आरोप सिद्ध होणार नाहीत. सर्व आरोप बदल्याच्या भावनेने लावण्यात आले आहेत. 

मागील आठवड्यात पाकिस्तान पीपल्स पार्टीचे नेता विलावल भूट्टो जरदारी म्हणाले होते की, सरकार पाडण्यासाठी आम्ही लवकरच अविश्वास प्रस्ताव आणू. आम्ही इम्रान सरकारला लोकतांत्रिक पद्धतीने पाडल्याशिवाय शांत बसणार नाही. पीएमएल-एनचे प्रवक्ता मरयम औरंगजेब म्हणाले की, 31 जानेवारीपर्यंत राजीनामा देण्यासाठी इम्रान खान यांच्यावर प्रचंड दबाव आहे. त्यांचे मंत्री सरकार पडण्याचे भीतीने घाबरले आहेत आणि जनता विरोधी पक्षांसोबत उभी आहे. 

गुजरातमध्ये भीषण अपघातात ट्रकने 13 मजूरांना चिरडले; PM मोदींनी व्यक्त केला शोक

दरम्यान, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी अर्णब गोस्वामी चॅट प्रकरणावरुन मोदी सरकारवर सडकून टीका केली होती.  2019 मध्ये संयुक्त राष्ट्र संघाच्या सर्वसाधारण सभेत बोलताना मी भारतामधील फॅसिस्ट असलेल्या मोदी सरकारनं देशातील निवडणुकीसाठी बालाकोट प्रकरणाचा वापर केला असल्यांचं म्हटलं होतं. एका भारतीय पत्रकाराच्या संवादातून हा नवीन खुलासा झाला आहे, असं ते म्हणाले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pakistan prime minister imran khan will resign 31 January