युरोपमध्ये सामूहिक लसीकरण सुरू;जागतिक साथीवर मात करण्याच्या दिशेने पहिले पाऊल

युरोपमध्ये सामूहिक लसीकरण सुरू;जागतिक साथीवर मात करण्याच्या दिशेने पहिले पाऊल

लंडन - कोरोनाच्या जागतिक साथीवर मात करण्याच्या उद्देशाने युरोपमध्ये सामूहिक लसीकरणाला प्रारंभ झाला आहे. त्यासाठी अभूतपूर्व पातळीवर सीमांतर्गत लसीकरण मोहीम रविवारी सुरू करण्यात आली.

जगभरात १७ लाख बळी घेतलेल्या आणि जागतिक अर्थव्यवस्था खिळखिळी केलेल्या कोविड-१९ विषाणूविरुद्ध  लशीचे अस्त्र परिणामकारक ठरण्याची आशा आहे. ४५ कोटी लोकसंख्या असलेल्या या विभागात विविध कंपन्यांशी करार करण्यात आला असून दोन अब्जांहून जास्त डोस मिळवण्यात आले आहेत. २०२१ वर्षात सर्व प्रौढांना डोस देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

विरोध अन्् आशा
फ्रान्सपासून पोलंडपर्यंत विविध देशांत लस टोचून घेण्याबाबत विरोधाची भावना मोठ्या प्रमाणावर असल्याचे सर्वेक्षणांमधून आढळून आले आहे. यानंतरही २७ देशांचा युरोपीय महासंघ पुढील वर्षी जनजीवन काहीसे पूर्वपदावर येण्याचा सर्वोत्तम मार्ग लसीकरणाचा असेल असा प्रचार करीत आहे.

टीकेनंतर एकत्रित प्रयत्न
विषाणू संसर्गाच्या विरोधात एकत्रित प्रयत्न करण्यात युरोपीय देशांमधील सरकारे अपयशी ठरल्याची टीका गेल्या वर्षाच्या प्रारंभी झाली. त्यामुळे आता संपूर्ण विभागात लसीकरणाची समान संधी सर्वांना मिळावी म्हणून एकत्रित प्रयत्न केले जात आहेत.

हंगेरीकडून घाई
हंगेरीत एक दिवस आधीच लस देण्याची घाई करण्यात आली. फायझर आणि बायोएनटेक या कंपन्यांनी तयार केलेली लस बुडापेस्टमध्ये अत्यावशक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना लस टोचण्यास सुरुवात झाली.

लसीकरणाच्या आघाडीवर

  • फ्रान्समध्ये बोटींमधून दोन डोसच्या लसचा पहिला साठा दाखल
  • बृहन पॅरिस आणि इतर एका विभागात लसीकरण सुरू होणार
  • जर्मनीत शुषृशा गृहांमधील ज्येष्ठांना सर्वप्रथम लस टोचणार
  • मालमोटारींमधून लशीची वाहतूक व वितरण सुरू
  • अनेक देशांत रुग्णालये, शुषृशा गृहांशिवाय क्रीडा केंद्रे, परिषदां होणारी सभागृहांचा सामुहिक चाचण्यांसाठी वापर
  • लॉकडाउनमुळे क्रीडा केंद्रे यापूर्वीच बंद ठेवण्यात आली आहेत
  • इटलीत लसीकरणासाठी सौरउर्जेवर चालणारे तंबू उभारण्यात आले
  • स्पेनमध्ये बेटांवरील भागांमध्ये विमानाने लशीची वाहतूक

निकष शिथिल
युरोपमधील आरोग्यसेवा यंत्रणा जगात सर्वोत्तम मानली जाते. यानंतरही लसीकरणाचे प्रचंड प्रमाण पाहता काही देशांत निवृत्त कर्मचाऱ्यांना पाचारण केले जात आहे, तर काही देशांनी लस कोण टोचू शकते याचे निकष शिथिल करून अतिरिक्त मनुष्यबळ मिळवण्यासाठी प्रयत्न केले आहेत.

आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

लसीकरणामुळे आशेचे दालन खुले झाले आहे, मात्र आपल्याला पुढे फार खडतर लढा द्यायचा आहे हे विसरून चालणार नाही. कोरोना विषाणूविरुद्धचा लढा इतक्यात संपणारा नाही.
- मार्ता टेमिडो,  पोर्तुगालच्या आरोग्य मंत्री

लसीकरण सुरू हा आनंदी नाताळचा संदेश आहे. जागतिक साथीला पराभूत करण्यात लस हा अनन्यसाधारण महत्त्वाचा घटक आहे. आपले जीवन परत मिळवण्यासाठी यास निर्णायक महत्त्व आहे.
- जेन्स स्पान, जर्मनीचे आरोग्य मंत्री

लस टोचून घ्यावी असे आवाहन मी देशबांधवांना करतो आहे. आपल्याला आपले स्वातंत्र्य परत नक्कीच मिळेल. आपण एकमेकांना पुन्हा आलिंगन देऊ शकू.
- लुईजी डी मायो,  इटलीचे परराष्ट्र मंत्री

हे वर्ष अत्यंत कठीण ठरले. ते मागे टाकण्याच्या दिशेने आम्ही एक पाऊल टाकत आहोत. जागतिक साथीतून बाहेर पडण्यासाठी लसीकरण हा चिरकाल टिकणारा मार्ग आहे.
- उर्सुला वॉन डर लेयेन,  युरोपीय आयोगाच्या अध्यक्ष

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com