युरोपात ३०-३५ डिग्री सेल्सिअसने हाहाकार, भारतात ४५वर पारा पोहोचूनही रस्ते वितळत नाहीत; कारण काय?

Europe Heatwave युरोपात ३०-३५ डिग्री सेल्सिअस तापमानाने हाहाकार उडालाय. याऊलट भारतात उन्हाळ्यात बहुतांश ठिकाणी ४० डिग्री सेल्सिअसच्या वर तापमानातही परिस्थिती इतकी बिघडत नाही. यामागे दोन्ही ठिकाणचे वातावरण कारणीभूत आहे.
Why Roads Melt in Europe but Not in India

Why Roads Melt in Europe but Not in India

Esakal

Updated on

युरोपसह अमेरिकन देशांमध्ये सध्या उष्णतेच्या तीव्र लाटेमुळे हाहाकार उडाला आहे. युरोपात तापमान ३० डिग्री सेल्सिअसच्या वर पोहोचलं आहे. फ्रान्समध्ये आठवड्याभरात दीड हजार पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय अनेक ठिकाणी रस्त्यांचे डांबर वितळलं आहे तर लोकांना उष्माघाताचा त्रास होत आहे. यामुळे अनेक नागरिकांना रुग्णालयात दाखल व्हावं लागलं आहे. सोशल मीडियावर युरोपातील उष्णतेच्या लाटेमुळे घडत असलेल्या घटनांचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. युरोपात ३०-३५ डिग्री सेल्सिअस तापमानाने हाहाकार उडालाय. याऊलट भारतात उन्हाळ्यात बहुतांश ठिकाणी ४० डिग्री सेल्सिअसच्या वर तापमान असतं. तरीही रस्ते वितळणं किंवा उष्माघाताने मृत्यूचे प्रमाण इतके नसते यामागे दोन्ही ठिकाणच्या वातावरण आणि राहणीमान कारणीभूत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com