दक्षिण आफ्रिकेतील व्हेरिएंटची युरोपात धास्ती; EU प्रवासावर घालणार बंदी | Corona Variant | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

flight ban

दक्षिण आफ्रिकेतील व्हेरिएंटमुळे धास्ती; EU प्रवासावर घालणार बंदी

कोविडच्या नवीन धोकादायक व्हेरिएंटमुळे जगभरातील देश सतर्क झाले असून तज्ज्ञांच्या मते, कोविडचे B.1.1.529 हे आतापर्यंतचा सर्वात म्यूटेड व्हर्जन आहे. नवीन कोरोना व्हेरिएंटमुळे (new corona variant) जर्मनी दक्षिण आफ्रिकेतून बहुतेक प्रवासावर बंदी घालणार असून इटलीने आफ्रिकेतून येणाऱ्या विमानांना बंदी घातली आहे. आता युरोपियन युनियन दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या विमानांवर बंदी घालण्याच्या तयारीत आहे. त्यासोबतच इस्त्राईलमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या व्हेरियंटचे एक प्रकरण आढळला आहे. दक्षिण अफ्रिकेत सापडलेल्या नवीन कोरोना व्हेरियंटमुळे सध्या युरोपाती काळजीचे वातावरण आहे.

वाढता धोका पाहता युरोपियन युनियनने (European Union) दक्षिण आफ्रिकेतून प्रवास करण्यास मनाई करण्याचा प्रस्ताव दिला आहे. सदस्य देशांना B.1.1.529 या नव्या व्हेरिएंटचा धोका पाहता दक्षीण आफ्रिकन प्रदेशातून विमान प्रवास थांबवण्यासाठी एमर्जेंसी ब्रेक लावण्याचे आदेश देण्यात येणार आहेत अशी माहिती EU प्रमुख उर्सुला वॉन डर लेयन (EU chief Ursula Von der Leyen) यांनी शुक्रवारी ट्विट करत दिली आहे.

जर्मनीने शुक्रवार रात्रीपासून दक्षिण आफ्रिका आणि इतर शेजारी राष्ट्रातून विमान प्रवासावर बंदी घातली आहे. जर्मनीचे आरोग्य मंत्री जेन्स स्पॅन म्हणाले की, केवळ जर्मन नागरिकांना प्रवेशाची परवानगी देण्यात आली आहे. लसीकरण केले असले तरीही त्यांना प्रवासानंतर 14 दिवस विलगीकरणात ठेवणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे.

गेल्या पंधरवड्यात दक्षिण आफ्रिका, लेसोथो, बोत्सवाना, झिम्बाब्वे, मोझांबिक, नामिबिया किंवा इस्वाटिनी येथे असलेल्या लोकांना देशात प्रवेश करण्यावर बंदी घालत असल्याचे रोममध्ये, सरकारने शुक्रवारी जाहीर केले आहे. आरोग्य मंत्री रॉबर्टो स्पेरांझा म्हणाले की, शास्त्रज्ञ नवीन B.1.1.529 व्हेरियंटचा अभ्यास करत आहेत, आणि यादरम्यान, आम्ही जास्तीत जास्त सावधगिरीचा मार्ग अवलंबू असे त्यांनी सांगीतले. ब्रिटनने जाहीर केले की दक्षिण आफ्रिका आणि त्याच्या त्याच शेजारील सर्व देशातून विमान प्रवासावर शुक्रवारी 1200 GMT पासून बंदी घातली आहे, दरम्यान ब्रिटनच्या या निर्णयाचा दक्षिण आफ्रिकेने तीव्र निषेध केला आहे.

भारतही सतर्क

भारताबद्दल बोलायचे झाले तर, आत्तापर्यंत B.1.1.529 कोविड व्हेरिएंटची एकही केस भारतात आढळलेली नाही. एएनआय या वृत्तसंस्थेने अधिकृत सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना लिहिलेल्या पत्रात कोविड B.1.1.529 व्हेरियंट अत्यंत म्यूटेड आहे. यामुळे देशाच्या सार्वजनिक आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. अशा स्थितीत व्हिसावरील निर्बंध शिथिल करणे आणि आंतरराष्ट्रीय प्रवासामुळे अडचणी वाढू शकतात. ते पुढे म्हणाले की धोका असलेल्या देशांतून येणाऱ्या लोकांची टेस्ट आणि ट्रॅक करणे गरजेचे आहे.